" लोकं कोविड चाचणी का करत नाहीत? ”

१९ मे २०२१

" लोकं कोविड चाचणी का करत नाहीत? ”


नमस्कार,

आपल्याला माहीत आहे सध्या संपूर्ण जग हे महामारीतून जात आहे आणि असं असतांना लोक कोविड चाचणी सांगितली की ती चाचणी करत नाहीत. लोकं ही चाचणी का करत नाहीत? त्यांच्या मनात काही शंका काही गैरसमज आहेत का? अशा अनेक प्रशांची उत्तरे आज आपण पाहूया.

कोविड चाचणी न करण्याची कारणे
 • लोकांच्या मनात एक चुकीचा समज झाला आहे की डॉक्टरनी कोविड चाचणी सांगितली आणि आपण ती केली तर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार?
 • जर मी कोविड चाचणी करायला गेलो आणि तिथे मला कोविड इन्फेकेशन झाले तर ?
 • जर मी पॉझिटिव्ह आलो तर पूर्ण कुटुंबातील व्यक्तींची चाचणी करावी लागेल त्याला जास्त खर्च येईल?
 • चाचणी पॉझिटिव्ह आली तर हॉस्पिटलमध्ये खूप जास्त खर्च होईल?
 • चाचणी पॉझिटिव्ह आली तर स्थानिक प्रशासनाची लोक त्रास देतील आणि जबरदस्ती विलगिकरण कक्षात पाठवतील?
 • कोविड औषधाचे दुष्परिणाम होतील?
 • मी कोविड पॉझिटिव्ह आलो तर लोक काय म्हणतील, माझ्याशी कसे वागतील?

हे सगळे प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे, पण जर आपल्याला या महामारीतून बाहेर यायचे असेल तर खंबीर होणे आणि आपले विचार सुधारणे गरजेचे आहे.

तर घरी उपचार घेऊन बरे होण्याऐवजी रुग्णालयात जावे लागते आणि रुग्णांची तबेत जास्त खलावू शकते.एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे लवकर निदान झाले तर घरीच कमी खर्चात उपचार होतात आणि रुग्ण लवकर बरे होतात आणि लवकर निदान झाले नाही तर रुग्णालयात दाखल करून ICU ची गरज लागली तर खूप खर्च होतो.

वरील सर्व गोष्टीतुन मार्ग कसा काढायचा?
 • लोक काय म्हणतील ह्याचा विचार करू नका
 • आपल्या डॉक्टरवर विश्वास ठेवा
 • सोशल मीडियावर येणाऱ्या चुकीच्या व अशास्त्रीय माहितीवर विश्वास ठेवू नका.
 • लगेच चाचणी करा आणि निदान झाल्यास लगेच उपचार घ्या
 • कोविड आजाराला घाबरून जाऊ नका,लक्षात ठेवा जास्त रुग्ण हे घरी औषध उपचार घेऊन बरे होतात.
 • जरी रुग्णालयात जावे लागले किंवा विलगिकरण कक्षात जावे लागले तरी हे थोडेच दिवस असते आयुष्यभर नसतं.

तेव्हा कोविड आजाराला एक आव्हान म्हणून पहा आणि त्याला सामोरे जा. लवकर निदान तर लवकर उपचार आणि लवकर उपचार तर लवकर बरे वाटणे तेही कमी खर्चात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. चला आपण सगळे या कोविड आजाराला मात देऊया. पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत सुरक्षित राहा,निरोगी राहा.

धन्यवाद,

स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा
Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.