थायरॉईड (Thyroid)

18 January, 2021

थायरॉईड (Thyroid)


थायरॉईड (Thyroid)
नमस्कार,

ऊर्जा हि माणसाची शक्ती असते आणि शरीराची ऊर्जा पातळी नियंत्रित करण्याचे काम हे थायरॉईड ग्रंथीमार्फत केले जाते. आज आपण याच थायरॉईड आजाराविषयी थोडी माहिती घेऊ.

थायरॉईग्रंथी या घ्याश्याच्या पुढील भागात फुलपाखरांच्या आकारा सारख्या असतात.

या ग्रंथी काही हॉर्मोन्स तयार करतात,ज्यामुळे आपल्या शरीरातील बऱ्याच अवयवाचे व्यवस्थापान केले जाते.

जर या ग्रंथीच्याहार्मोन्स तयार करण्याच्या प्रक्रि येत बदल झाला तर त्याचा परिणाम शरीरातील इतरभागात दिसतो.

थायरॉईड हार्मोनल असंतुलनामुळे एक तर हायपोथायरॉईडीझम होतो किंवा हायपरथायरॉईडीझम होतो. एक अजून तिसराप्रकार आहे तो म्हणजे गोइटर.

थायरॉईडसंप्रेरक शरीरात कमी प्रमाणात तयार होतात तेव्हा हायपोथायरॉईडीझम होतो त्याची काही कारणे पुढील
  • ऑटोइम्यून डिसऑर्डर
  • ओव्हरकोरेक्टेड हायपोथायरायडिझम
  • थायरॉईड शस्त्रक्रिया
  • रेडिएशन थेरपी

हायपोथायरॉईडीझम साठी डॉक्टर TSH,T3,T4 काही रुग्णांमध्ये यांच्या पातळीत घट सुद्धा पाहण्यात येते.आयुष्यात एकदा तरी डॉक्टर ANTI TPO ANTIBODY नावाची चाचणी करण्याचा सल्ला देतात त्यामुळे हे समजते कि ऑटोइम्यून थायरॉईड आहे का नाही.

हायपोथायरॉईडीझम च्या उपचारासाठी लेव्हिथ्रोक्झिन औषधाचा वापर करतात.

हायपोथायरॉईडीझम आजारपणात नियमित शारीरिक हालचाल, व्यायाम आणि वजन कमी होणे खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

थायरॉईड आजाराचा दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे हायपर थायरॉईडीझम,ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथीमधून हार्मोन्सचे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते.हायपर थायरॉईडीझम हि एक ऑटो इम्यून स्थिती आहे.

हायपर थायरॉईडीझमची सामान्य लक्षणे
  • घाबरणे/भितीवाटणे
  • छातीची धडधडजाणवणे
  • भूक वाढणे
  • वजनात घट
  • एकाग्रता हरपणे
  • केस गळणे
  • स्त्रियांमध्ये मासिक पाळीची अनियमितता हादरा
  • हाताचे कंपन

हायपर थायरॉईडीझम आजारपणात TSH पातळी कमी होते आणि T3,T4 स्तर अनेक वेळा जास्त होते

हायपर थायरॉईडीझम मधे काहीवेळा आम्ही न्यूक्लियर थायरॉईड स्कॅन करणे आवश्यक असते तर काही वेळा थायरॉईड सोनोग्राफी हे देखील करावी लागते हायपर थायरॉईडीझम आजारपणात उपचारासाठी कार्बीमाझोल,बीआणिब्लॉकर्स,किरणोत्सर्गी आयोडीन यांचा वापर करतात.

थायरॉईडच्या आजारातील तिसरा प्रकार म्हणजे गोइटर,यामध्ये थायरॉईड पातळी बर्‍याच वेळा नार्मल असते.गोइटरचे निदान करताना थायरॉईड सोनोग्राफी बरोबर FNAC चाचणी करण्याचा सल्ला देतात.

या निदान पध्दतीत एक लहान सुई थायरॉईड ग्रंथी टाकून त्यातील काही घटक घेतले जातात आणि त्याचे सूक्ष्म मूल्यमापन केले जाते. गोइटर मधे जर थायरॉईड लेव्हल मधे असंतुलन असेल तर त्यानुसार त्यावर उपचार केले जातात.

तर मित्रांनो वेळेवर निदान, योग्य उपचार आणि नियमित पाठपुरावायांच्या मदतीने आपण थायरॉईड आजारपणातील गुंतागुंत टाळू शकतो. थायरॉईड एक संप्रेरक असंतुलनामुळे निर्माण होणारी समस्या आहे.

धन्यवाद,

स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा
Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.