चांगली झोप मिळवण्यासाठी सोपे उपाय

18 January, 2021

चांगली झोप मिळवण्यासाठी सोपे उपाय


चांगली झोप मिळवण्यासाठी सोपे उपाय
नमस्कार,

आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सकाळी लवकर उठणे हि एक चांगली सवय आहे हे आपण लहानपणी पासून ऐकत आलो.

चांगले आरोग्यमिळावंयासाठी आपण व्यायाम आणि आहारया गोष्टीचा प्रामुख्याने विचार करतो पण पुरेशीझोप आणि चांगली झोप देखीलयासाठी आवश्यक आहे.पुरेशी झोप मिळाली नाहीतर त्याचे काय दुष्परिणाम आरोग्यावर होतात आणि ते कसे आपण टाळू शकतो याविषयी थोडी माहिती घेऊ. नॅशनलस्लिप फाउंडेशनअनुसार रोजकिमान ७- ९ तास झोप उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे.

जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीरात मेल्येटोनीन नावाचे संप्रेरक तयार होते आणि मेंदूतील पियुषग्रंथीमधून ग्रोथहॉर्मोन तयार होते जे आपल्या शरीराच्यावाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी उपयोगाचे असते

त्याच बरोबर जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीरात सायटोकाईन्सची निर्मिती होते त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

पुरेशी झोप न मिळाल्याने होणारे दुष्परिणाम
 • अतिरिक्त वजनवाढ किंवा ओबेसिटी
 • मेंदूच्या कार्यात अडथळे
 • शारीरिक क्षमतेत घट
 • हृदयासंबंधित आजार, स्ट्रोक,डायबेटीस ई. आजार होण्याची शक्यता जास्त असते
 • रक्तदाब आणि डिप्रेशन समस्या
 • मानसिक आजार

ई.गोष्टी पुरेशी झोप न घेतल्याने होऊ शकतात. आता आपण पाहू वरील समस्या न होण्यासाठी काय उपाय केले पाहिजे.

चांगली झोप मिळवण्यासाठी सोपे उपाय
चांगली झोप मिळावी यासाठीचे उपाय
 • दिवसभरातुन थोडा वेळ कोणत्याही प्रकारचा व्यायाम
 • रात्रीचे जेवण थोडे कमी घ्या
 • संध्याकाळ नंतर चहा ,कॉफी किंवा मद्यपान करू नये
 • इलेक्ट्रॉनिक उपकरणे झोपण्यापूर्वी २ तास आधी बंद करा(टीव्ही,मोबाईल, लॅपटॉप)
 • बेडरूम शांत असणे आवश्यक. मंद आवाजात संगीत किंवा पुस्तक वाचू शकता
 • कोंबट पाण्यानी झोपण्यापूर्वी अंघोळ करणे चांगले
 • शक्यता झोपण्याची आणि जागे होण्याची वेळ ठरवून ठेवा त्यात बदल न करणे चांगले.

तर मित्रांनो हे होते चांगली झोप मिळवण्यासाठी काही सोपे उपाय.

चांगला दिवस जाण्यासाठी चांगली मानसिक आणि शारीरिक स्थिती आवश्यक आहे आणि यादोन्हीं गोष्टी मिळवण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप गरजेची आहे. पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन, तोपर्यंत .

धन्यवाद,

स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा
Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.