गर्भधारणा असताना होणारा मधुमेह

05 August, 2021

गर्भधारणा असताना होणारा मधुमेह


संगीत आणि आरोग्य (Music & Health)
नमस्कार मित्रांनो ,

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१९ च्या आकडेवारी नुसार जगात २ कोटींपेक्षा अधिक महिलांना गरोदरकाळा दरम्यान मधुमेह झाल्याचे दिसून आले,हा आकडा दरवर्षी वाढत चालला आहे,म्हणून आम्ही आज हा विषय चर्चेसाठी निवडला आहे.आज आपण काही सोपे उपाय पाहू ज्यामुळे गरोदर काळादरम्यान वाढलेली मधुमेह पातळी नियंत्रित करणयात आपल्याला मदत होईल.

गरोदरकाळा दरम्यान रक्तातील साखरेचे प्रमाण का वाढते?
  • टाईप १ डायबेटीस
  • टाईप २ डायबेटीस
  • जेस्टेशनल डायबेटीस (गरोदरपणातील मधुमेह)
गरोदरपणात मधुमेह का होतो ?

प्लासंटा हा आई आणि जन्माला येणारे मूल यांना जोडणारा शारीरिक भाग असतो तो भाग काही रसायने तयार करतो ज्यामुळे त्या महिलांमधील शुगर पातळी वाढू लागले. सर्वसामान्य स्त्रियांमध्ये गर्भधारणा असताना त्यांचे स्वादुपिंड आशा प्रमाणात इन्सुलिन तयार करतात की त्यांची वाढलेली शुगर पातळी नियंत्रणात राहते. परंतु काही महिलांमध्ये इन्सुलिन कमी तयार होते अथवा इन्सुलिन व्यवस्थित काम करत नाही त्यामुळे त्यांची शुगर पातळी वाढण्याची शक्यता असते.

कोणत्या महिलांमध्ये गर्भधारणा असताना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो?
  • जास्त वजन असणाऱ्या महिला
  • अनुवैशिक मधुमेह
  • PCOD
  • आधीच्या गर्भधारणे वेळी मधुमेह असणे
  • रक्तदाब असणाऱ्या महिलाे
  • कोलेस्टेरॉल
  • हृदयाचे विकार
गर्भधारणेतील मधुमेहाचे निदान कसे करतात ?

GTT नावाची तपासणी करून गर्भधारणेतील मधुमेहाचे निदान केले जाते. ज्या महिलांमधे या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते त्यांना पहिल्या तीन महिन्यात तपासणी करण्याचा सल्ला देतात आणि सामान्य महिलांना ६-७ व्या महिन्यात ही तपासणी करण्यास सांगितले जाते.

GTT चाचणी कशी करतात ?

GTT तपासणी करताना आधी १२ तास उपाशीपोटी राहिल्यानंतर रक्त घेतले जाते,त्यानंतर ७५ ग्राम अनहायड्रेटेड ग्लुकोज किंवा ८२.५ ग्राम ग्लुकोन डी पावडर पाण्यात मिसळून पिण्यास सांगतात आणि त्यानंतर १ व २ तासानंतर पुन्हा रक्त तपासणीसाठी घेतात.

GTT चाचणीचे मूल्यमापन कसे करतात?

उपाशीपोटी शुगर पातळी ९५ पेक्षा अधिक आहे, १ तासानंतरचे प्रमाण 180 पेक्षा अधिक आहे, २ तासानंतर प्रमाणात १५३ पेक्षा अधिक असेल तर त्यांना गर्भधारणेतील मधुमेह आहे असे म्हणतात.

गर्भधारणेतील मधुमेह कसा हाताळला पाहिजे?
  • घरी ग्लुकोमीटरने दिवसात चार वेळा मधुमेह तपासणी करणे
  • मेडिकल न्यूट्रिशन थेरेपी( स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या सल्ल्याने डाएट आणि शारीरिक व्यायाम करणे )
  • तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्सुलिन आणि औषधे घेणे.
गर्भधारणा असतांना मधुमेहाचे निदान न झाल्यास कोणते संभाव्य कॉम्प्लिकेशन होतात?

१) मातांमध्ये :-

  • PRE ECLAMPSIA:- रक्तदाब वाढण्याचा संभव असतो
  • PRE TERM LABOUR:- दिलेल्या वेळेआधी मुलं जन्माला येणे
  • POLYHYDRAMNIOS :- यूट्रसमधे एमनीओटीक फ्लूईड वाढते

२) मुलांमध्ये :-

  • मुलांचा आकार आणि वजन जास्त वाढू शकते.
  • मुलांना जन्मजात लोशुगर असू शकते.
  • फुफुसांच्या वाढीवर परिणाम.
  • जन्मानंतर कावीळ होणे.

गर्भधारणा असताना मधुमेह होणे आणि उपचार घेणे हे जरी सोपे नसले तरी अशा महिलांनी टेन्शन घेऊ नये कारण योग्य उपचार आणि फोकस ठेवला तर या त्रासातून महिला लवकर बाहेर येऊ शकतात. कारण हा मधुमेह काही काळासाठी असतो,बरेच वेळा प्रसूतीनंतर महिलांची शुगर पातळी नॉर्मल होते. काहीवेळा काही महिलांना प्रसूती नंतर टाईप २ मधुमेह होण्याची संभावना असते. परंतु रेग्युलर व्यायाम, संतुलीत आहार आणि योग्य उपचार यामुळे आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. तेव्हा पुन्हां भेटू नवीन विषय घेऊन. व्हिडीओ पाहण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर टिक करा. https://youtu.be/aUuMNbeyFcs

धन्यवाद,

Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.