अर्धर्शिशी (Migraine)

27 January, 2021

अर्धर्शिशी (Migraine)


अर्धर्शिशी (Migraine)
नमस्कार,

तीव्र डोकेदुखी किंवा अर्धर्शिशी या नावाने ओळखला जातो.आजच्या काळातील डोकेदुखीचे त्रासदायक आजार आपण कसे टाळू शकतो व अर्धशिशी रोगाचे लवकर निदान करून सुलभ जीवन कसे जगू शकतो? या विषयी माहिती घेऊया.जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार अर्धर्शिशी (मायग्रेन) हा जगातील तिसरा सर्वात सामान्य आजार आहे आणि जगातील जवळजवळ 15 टक्के लोक या आजाराने ग्रस्त आहेत.महिलांना हा आजार जास्त प्रमाणात होतो असे समोर आलेल्या संख्यावरून समजते.

अर्धर्शिशी (मायग्रेन) म्हणजे काय ?

मायग्रेन हि एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामध्ये रूग्णांना प्राथमिक स्वरूपात तीव्र डोकेदुखीची समस्या होते ,काही इतर लक्षणे देखील या मध्ये दिसून येतात.

अर्धर्शिशीची करणे

अर्धर्शिशी हा आजार प्रामुख्याने काही घटकांमुळे किंवा काही कारणामुळे होऊ शकतो, हि कारणं समजून घेणे गरजेचे आहे जर हि कारण समजली तर आपण आपला बचाव करू शकतो.

  • जेवण न करणे
  • अल्कोहोल किंवा कॅफिनेटेड पेयाचे सेवन जास्त असणे
  • अपुरी झोप
  • अति शारीरिक व मानसिक श्रम
  • प्रखर उजेड
  • मोठा आवाज
  • तीव्र वास
  • विशिष्ट पदार्थांचे सेवन
  • महिलांमध्ये मासिक पाळी
अर्धर्शिशी आजारातील लक्षणे
  • डोक्याचा एक भाग दुखणे कीव तीव्र डोके दुखी
  • मळमळ
  • उलट्या होणे
  • अकारण भीती वाटणे
  • धुसर दिसू लागणे
  • चक्कर येणे
  • पॅरेस्थेसियस
  • फार क्वचित वेळा बेशुद्धावस्था

सामान्य अर्धर्शिशी अटॅक ४ तास ते ७२ तास रुग्णाला त्रासदायक असतो. अर्धर्शिशीचे निदान करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट चाचणीची गरज नाही कारण रुग्णांच्या लक्षणावरून याचे निदान होते. काही वेळा डॉक्टर मेंदूचे स्कॅन करण्याचा सल्ला देतात त्यावरून डॉक्टरांना अर्धर्शिशीचे कारण समजते.

अर्धर्शिशीसाठी उपचार केव्हा घ्यावे ?

अर्धर्शिशीसाठी उपचार केव्हा घ्यावे हा प्रश्न सर्वाना नेहमी पडतो,ज्यावेळी अर्धर्शिशी मुळे दैनंदिन जीवनात त्रास होत असेल अथवा अर्धर्शिशीची लक्षणे महिन्यातून २ ते ३ वेळा दिसून आली कि लगेच डॉक्टरांना संपर्क करा.

अर्धर्शिशीचे उपचार कसे करतात ?

अर्धर्शिशीवर उपचार करत असताना दैनंदिन जीवनातील बदल आणि ज्यामुळे हा त्रास होतो अशा घटकांना दूर ठेवणे जास्त महत्वाचे आहे. म्हणून आम्ही रुग्णांना वेळेवर आहार,पुरेशी झोप,पाणी जास्त पिणे आणि मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी योगा व ध्यान करण्याचा सल्ला देतो. रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी एक गोष्ट समजणे महत्वाचे आहे कि अर्धर्शिशीवर निश्चित औषध नाही पण जर जीवनशैलीत बदल केले तर अनेकदा उपचारांची देखील गरज लागत नाही.

काही रुग्णांना निश्चितच उपचार घ्यावे लागतात यात दोन पद्धीतीने उपचार केला जातो
१) वेदना शामक औषध
२) प्रतिबंधात्मक थेरपी

अर्धर्शिशी या आजारात रुग्णांकडून होणाऱ्या सामान्य चुका
  • डॉक्टरांना न विचारता वेदना शामक औषधांचे सेवन करणे
  • जास्त वेळा तीव्र डोके दुखी असूनही डॉक्टरांकडे न जाणे
  • जीवनशैलीत बदल न करणे
  • डॉक्टरांना न विचारता उपचार बंद करणे
  • मेडिकल मधून स्वतःहून औषध घेणे

या चुकांमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. आता अनेक चांगली औषधे या आजारावर उपलब्ध आहेत पण ती योग्य डॉक्टर किंवा न्यूरॉलॉजिस्ट यांच्या सल्ल्यानुसार घेतली पाहिजे.तर हि होती अर्धर्शिशी या आजरा विषयी माहिती पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन.

धन्यवाद,

स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा
Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.