व्यायाम आणि निरोगी आयुष्य

16 Junes, 2020

व्यायाम आणि निरोगी आयुष्य


व्यायाम म्हणजे काय ?

शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम.

नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्ययामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही छान राहते.

व्यायाम कसा करावा?

सुदृढ शरीरासाठी व्यायाम आवश्यक असतो. लहान मुलांपासून सत्तरी गाठलेले वयोवृद्धही व्यायाम करू शकतात. मात्र, वयाला आणि तब्येतीला मानवेल, एवढाच व्यायाम करावा. व्यायामाला वयाची अट नाही. लहान मुलांपासून सत्तरी गाठलेले वयोवृद्धही व्यायाम करू शकतात. आजारी असताना, ताप असताना, गर्भारपणामध्ये किंवा मोठे ऑपरेशन झाले असल्यास व्यायाम न करण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा, व्यायाम कधीही करायला हरकत नाही.

व्यायामाचे प्रकार
  • ताणण्याचे व्यायाम : उदा. योगासने, सूर्यनमस्कार
  • एरोबिक्स (रक्ताभिसरणाचे) व्यायाम उदा. चालणे, धावणे, जॉगिंग, नृत्य, पोहोणे, सायकल चालविणे
  • श्वासाचे व्यायाम उदा. प्राणायाम
  • शक्तिचे व्यायाम .उदा. वजन उचलणे व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.यामुळे माणूस आनंदी रहातो. व्यायामामुळे आपली मानसिक तसेच शारीरिक शक्ती वाढते. लहान मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा हि सध्याची गंभीर जागतिक समस्या आहे आणि व्यायामामुळे हि समस्या कमी होण्यास मदत होते.
व्यायामाचे फायदेे

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा हा अत्यंत योग्य उपाय आहे. नियमित योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. तुम्ही आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेऊ इच्छित असाल तर योगा हा नक्कीच चांगला उपाय आहे. पाहूया काय आहेत योगा करण्याचे फायदे –

  • वजन नियंत्रित राहण्यास मदत
  • शारीरिक क्षमते मध्ये वाढ
  • नैराश्याचे प्रमाण कमी होणे
  • उत्साह वाढणे
  • शरीर पिळदार होणे
  • रोग प्रतिकार क्षमता वाढते
  • स्नायू मजबूत होतात
धन्यवाद,

स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा
Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.