चक्कर येणे (GIDDINESS)

03 March, 2021

चक्कर येणे (GIDDINESS)


Acidity
नमस्कार,

आज आपण चक्कर येणे या विषयावर चर्चा करू,जगात २०-३० % लोकांना चक्कर येणे हा त्रास असतो. चक्कर येणे हा आजार असा आहे कि याला कारणे अनेक असतात आणि याची लक्षणे सुद्धा वेगळीवेगळी असतात. चक्कर हि एक तर छोट्या-मोठ्या मानसिक कारणामुळे येऊ शकते अथवा मेंदूतील बिघाडामुळे देखील येऊ शकते.

चक्कर येण्याची कारणे
  • BPPV
  • मेनियर आजार
  • डिहायड्रेशन
  • रक्तदाब
  • हृदय आजार
  • मेंदूचे आजार
  • भीती वाटणे
  • हायपोग्लिसेमियाे
  • कानात इन्फेकशन
  • जास्त शारीरिक ताण
  • अर्धर्शिशी
  • अशक्तपणा
चक्कर येण्याची लक्षणेे
  • गरगरणे किंवा गोल फिरल्यासारखे वाटणे
  • शारीरिक संतुलन बिघडणे
  • मळमळणे
  • उलटी होणे
  • बेशुद्ध पडणे
  • हलकी डोकेदुखी

डोके दुखापत,डोकेदुखी,जास्त ताप,धूसर दृष्टी,सुनावणी तोटा,शुद्ध हरपणे,बोलण्यात अडचण,छाती दुखणे किंवा धडधडणे ई लक्षणे दिसली तर वेळ न घालवता लगेच आपल्या डॉक्टरांना संपर्क करावा.

चक्कर येणे आजाराचे निदान कसे केले जाते?
  • क्लिनिकल तपासणी (डोळा आणि कान)
  • न्यूरोलॉजिकल परीक्षण
  • रक्त चाचण्या
  • ब्रेन स्कॅन एमआरआय
उपचारपद्धती

उपचारपद्धती हि रुग्णाला ज्या कारणांमुळे चक्कर येते त्यानुसार असतात

  • BPPV (BD व्यायाम आणि Epley )
  • हायड्रेशन
  • मायग्रेनची औषधे
  • अ‍ॅक्सिऑलिटिक्स
चक्कर येणे संबंधित प्रतिबंधात्मक उपाय
  • शरीराच्या स्थितीत अचानक बदल टाळा
  • स्थिरतेसाठी आधार वापरणे
  • संतुलीत व्यायाम करणे
  • काही दिवस वाहन चालविणे टाळा
  • पुरेसे हायड्रेशन
  • काही दिवस वाहन चालविणे टाळा

अशा प्रकारे काळजी घेऊन आपण चक्कर येणे या समस्येचे निदान करून त्यावर मात करू शकतो तसेच भविष्यातील येणाऱ्या समस्या टाळू शकतो.

धन्यवाद,


स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा

Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.