जागतिक मधुमेह दिवस

14 November, 2020

जागतिक मधुमेह दिवस


नमस्कार,
“१४ नोव्हेंबर” जागतिक मधुमेह दिवस म्हणून का साजरा केला जातो ?

“१४ नोव्हेंबर” ही एक महत्त्वपूर्ण तारीख आहे कारण फ्रेडरिक बॅन्टिंग यांचा हा जन्म दिवस आहे.फ्रेडरिक बॅन्टिंग यांनी इंसुलिनचा शोध १९२२ मध्ये लावला.संपूर्ण जगात हा दिवस जागतिक आरोग्य संघटने मार्फत साजरा केला जातो.मधुमेह या विषयावर जनजागृती या दिवशी केली जाते.

मधुमेहाचे सार्वत्रिक चिन्ह कोणते ?

निळ्या रंगाचे वर्तुळ हे मधुमेहाचे सार्वत्रिक चिन्ह आहे. मधुमेहाने ग्रस्त लोकांच्या वाढत्या संख्येला प्रतिसाद म्हणून हे जागतिक मधुमेहाच्या समुदायाच्या ऐक्याचे प्रतीक आहे.

मधुमेह दिनाच्या दिवशी जागरूकता कशी निर्माण करावी ?
  • सोशल नेटवर्कवर शास्त्रोक्त माहिती वाचा आणि शेअर करा.
  • मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी व्यायाम,झुंबा,डान्स ई ऑनलाईन स्पर्धा आयोजित करा.
  • मधुमेह चाचणी शिबीर ( मोफत / कमी दारात ) आयोजित करा.
  • ब्लू सर्कल सेल्फी घ्या आणि सोशल मीडियावर अपलोड करा.
  • शक्य असेल तर यादिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करा.
  • आपण मधुमेहावर कसे नियंत्रण मिळवले याचे व्हिडीओ,माहिती इतरांना सांगा.
  • अशा प्रकारे आपण १४ नोव्हेंबर मधुमेह दिवस साजरा करावा. तर पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
धन्यवाद,

स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा
Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.