मधुमेह असतांना पायांची घ्यायची काळजी

१९ मे २०२१

मधुमेह असतांना पायांची घ्यायची काळजी


नमस्कार,

अमेरिकन विशेष वृत्तपत्रामधे दिलेल्या आकडेवारी नुसार जगात दर 30 सेकंदाला एका व्यक्तीचे पाय कापावे लागतात. डायबेटिक फूट अल्सर हे त्याचे कारण असते,म्हणून आज आपण डायबेटिक फूट केअर या विषयी माहिती घेऊ,ज्यात आपण पाहू मधुमेह असणाऱ्या व्यक्तिंनी त्यांच्या पायाची निगा कशी राखावी.

मधुमेहाचा पायावर काय परिणाम होतो?

मधुमेह असताना A.G.E. नावाचे रसायन शरीरात वाहत असते ज्याच्यामुळे रक्त घट्ट होतं आणि त्याठिकाणी रक्त साठून ब्लॉक होत. जेव्हा ही प्रक्रिया पायाच्या नसामधे होते तेव्हा पेरिफेरल व्हॅसक्युलर डिसीज होऊ शकतात.त्याच प्रमाणे मधुमेह जास्त असल्याने काही रुग्णाना पेरिफेरल न्युरोपॅथीची समस्या बऱ्याचदा होते हीच सामान्य कारणे डायबेटिक फूट अल्सरची असतात.

पेरिफेरल न्युरोपॅथीची व PVD ची सामान्य लक्षणे
 • पायांची जळजळ
 • पोटरीचे स्नायू दुखणे
 • पायांना मुंग्या येणे
 • पायांच्या बोटात फंगल इन्फेकॅशन
 • पायांची त्वचा जाड होणे
 • पायांना इजा होणे (फूट अल्सर)
 • वेळेत उपचार न केल्यास गॅग्रीन होणे
पायांची काळजी घेऊन नुकसान टाळण्यासाठी काही टिप्स
 • रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे
 • रुगांची गंभीरता ओळखणेे
 • पाय नियमित सांभाळणे
 • रक्तदाब, कोलेस्टेरॉल इ योग्य उपचार घेणेे

काही वेळा रूग्णांना काही लक्षणे दिसत नाहीत परंतू डायबेटिक न्यूरोपॅथी असते त्याला "ASYMPTOMATIC NEUROPATHY" म्हणतात.वर्षातुन एकदा सर्व मधुमेह रुग्णानी पायांची तपासणी करावी.

पायांच्या तपासणीसाठी कोणत्या चाचण्या असतात?
 • सेन्सेशन आणि पल्स तपासणी
 • मोनोफिलॉमेंट टेस्टिंगेे
 • ट्युनिंग टेस्टिंगे
 • पायांची त्वचा तपासणेेे
काही विशिष्ट चाचणी पुढिल प्रमाणे
 • अँकल ब्रेकल इंडेक्स
 • पोडीआ स्कॅन
 • बायोथिसीओमेट्री
काही क्वचित रुग्णांमध्ये पुढील चाचणी सांगीतल्या जातात
 • अरटेरिअल डॉप्लर
 • नर्व्ह कंडक्शन स्टडी
 • पेरिफेरल अंजिओग्राफी
काही सोपे उपाय करून आपण या दुखण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो.
 • आपल्या पायाकडे नियमित लक्ष ठेवा.
 • आरश्यात आपले पाय तपासा
 • रोज झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा
 • नियमित मॉइश्चरायझर वापर करा,पण बोटाच्या मध्ये क्रीम लावू नका.
 • बोटांची नखे व्यवस्थित सरळ कापा जेणेकरून नखांमुळे इजा होणार नाही.
 • थंडीमधे सैल मोजे वापरा.
 • घरात चपला वापरा.
 • पायात कॅलस जाणवल्यास डॉक्टराना संपर्क करा,घरी स्वतःहून उपचार करू नका.
 • धूम्रपान बंद करा
 • पायांना जखम,अल्सर असल्याचे जाणवल्यास लगेच डॉक्टरला दाखवा.

तर मित्रानो स्वतःचा बचाव हा उपचारांपेक्षा कधीही चांगला. म्हणून आज आपण पाहिलं आपल्या पायांची कशी निगा राखून आपण आपले पाय मधुमेह असतांना चांगले ठेवू शकतो. तेव्हा आपली काळजी घ्या .

धन्यवाद,

स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा
Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.