"मधुमेह रुग्णांनी कोरोना उपचारानंतर घ्यायची काळजी”

01 June, 2021

"मधुमेह रुग्णांनी कोरोना उपचारानंतर घ्यायची काळजी”


Acidity
नमस्कार,

मधुमेह असलेल्या लोकांनी जर कोविड होऊन गेल्यानंतर योग्य काळजी घेतली तर त्यांना त्याचा खूप चांगला परिणाम दिसतो याउलट जर काळजी घेतली नाही तर अनेक समस्या निर्माण होतात म्हणून आज आम्ही आपल्याला या विषयावर थोडं मार्गदर्शन करणार आहोत.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी जास्त काळजी का घावी ?
 • मधुमेह असलेल्या रुगांची प्रतिकार शक्ती थोडी कमी असल्याने त्यांना इतर इन्फेकॅशन होण्याची संभावना असते.
 • मधुमेह असलेल्या लोकांचे रक्त घट्ट असते त्यामुळे हृदयाशी संबंधित कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते.
 • होम आयसोलेशन किंवा रुग्णालयातुन घरी आल्यानंतर शुगर लेव्हल मध्ये बदल होणे सामान्य आहे.
शुगर वाढण्याची कारणे
 • मानसिक तणाव
 • शारीरिक तणाव
 • स्टिरॉइड्स औषधाचा वापर
शुगरची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही टिप्स
 • घाबरू नका
 • ब्लड शुगर चेक करा
 • सपुरेसे पाणी घ्या.
 • वेळेवर आणि समतोल आहार घ्या
 • आपल्या डॉक्टरांबरोबर योग्य फॉलोअप ठेवा.
 • होम आयसोलेशन मध्ये असाल किंवा थकवा असेल तर डॉक्टरला ऑनलाइन संपर्क साधा.
 • आपली शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी आपले डॉक्टर योग्य ते औषधं बदलून देतील
 • काही वेळा खूप जास्त प्रमाणात शुगर वाढली असेल तर डॉक्टर इन्सुलिनच्या वापराने शुगर नियंत्रित करतात.
 • कोविड उपचारानंतर डॉक्टर काही दिवसासाठी ब्लड थिनर औषधे देतात याचा वापर करून इतर कॉप्लिकेशन टाळू शकतो
 • कोविड उपचारानंतर खूप कमी रूग्णांना काही वेळा विशिष्ट चाचण्या किंवा ऍडमिट करावे लागते.
 • काही रूग्णांना शुगर चढ-उतारा बरोबर जास्त ताप असेल तर आशा रूग्णांमध्ये यूरीनरीट्रॅक इन्फेकॅशन किंवा पायलोनेफ्राटीस होण्याची शक्यता जास्त असते.
 • काही रूग्णांमध्ये जास्त शुगर वाढण्याबरोबर डोळे दुखी, डोळ्याला सूज येणे किंवा चेहेरा दुखणे अशी लक्षणे दिसतात अशा रुग्णांत म्युकोर मयकॉसिस होण्याची शक्यता असते अशा वेळी रुग्णांनी लवकरात लवकर आपल्या डॉक्टरशी संपर्क करणे गरजेचे असते.

कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता शांतपणे योग्य उपचार आणि आहार ठेवून आपण कोविड नंतर मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतो व पुढील कॉम्प्लिकेशन टाळायचा प्रयत्न करू शकतो. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन.

धन्यवाद,


स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा

Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.