"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून बरे झाल्यावर कशी काळजी घ्यायची?”

01 June, 2021

"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून बरे झाल्यावर कशी काळजी घ्यायची?”


Acidity
नमस्कार,

कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर काळजीघेणे गरजेचेआहे कारण अनेक लोकांना काही न काही त्रास होताना दिसत आहे. आपण आमच्या मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलात म्हणून हा विषय घेऊन आज आम्ही आपल्या समोर आलो आहे .

कोविडच्या दुसऱ्या लाटेमधे बरे झालेल्या रुग्णांना काही लक्षणे दिसतआहेत, त्यावरील उपाय थोडक्यात पाहु:-

१) कोरडा खोकला:

काही दिवस ते काहीआठवडे हा त्रास राहतो, काही वेळा गरज असेल तर कफ सिरप दिले जातात किंवा काही वेळा इंहेलेशन स्टिरॉइड्स दिले जातात.

२) जी.आय.डिस्टर्बस:

या मधे रुग्णांना ऍसिडिटी, डायरिया किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तेव्हा काही वेळा एंटासिड लक्झेटिव्ह दिले जातात.

३) अंगदुखीसांधेदुखी:

हा त्रास काही काळासाठी असतो पण जर जास्त त्रास होत असेल तर पॅरासेटमोल किंवा पेनकिलर दिली जातात.

४) घसादुखणे

हा त्रास असेल तर फक्त मीठ पाणी गुळणी किंवा बिटाडीन घालून गुळणी करण्याचा सल्ला दिला जातो.

५) डोळे लाल किंवा गुलाबी होणे:

सामान्यतः या साठी कोणत्या ही ट्रीटमेंटची गरज लागत नाही तरी जास्त त्रास झाला तर आपण आपल्या डोळ्याच्या डॉक्टरना संपर्क साधा.

६) मधुमेह रुग्णांमध्ये शुगर लेव्हल मधील बदल:

हा त्रास जाणवत असेल तरआपण आपल्या डॉक्टरला भेटा किंवा कोणत्याही डायबेटोलॉजिस्टशी संपर्क करा.

७) वासआणिचव न लागणे:

या साठी कोणतेही औषध नाही परंतु काही वेळा ओलफॅक्टरी ट्रेनिंग करून हा त्रास कमी केला जाऊ शकतो असे काही डॉक्टरआणि रिचरसर्सचे मत आहे.

८) ताप येणे:

कोरोनाच्या पहिल्या फेजपेक्षा दुसऱ्या फेज मध्ये ही समस्या जास्त दिसत आहे. याचे सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे लेटसायटॉकिनस्रोम किंवा काही मधुमेही रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असते म्हणून युरिन ट्रॅकइन्फेकॅशन होते आणि ताप येतो.

९) लॉंगहौलकोविड:

who आणि cdc यांच्या नुसार दहा मधील एका रुग्णाला कोविडनंतर 6 ते 12 आठवड्या पेक्षा जास्त काळ लक्षणे असू शकतात, यालाच लॉंगहौलकोविड म्हणतात. यात छातीवर दाब येणे, छाती जड वाटणे, सांधेदुखी, अंगदुखी, श्वास घेताना दम लागणे ई लक्षणे दिसतात यावर उपचार करून ती बरी होतात. या सगळ्या परिस्थितीत काळजी वाटणे स्वाभाविक आहे पण एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे ते म्हणजे खडतर दिवस कायम राहत नाहीत त्यातून पुढे अजून चांगले दिवसही येतात. परत भेटू नवीन विषया वर चर्चा करायला तो पर्यन्त काळजी घ्या.

धन्यवाद,


स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा

Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.