विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात,विचारांचा माणसाच्या आरोग्यावर प्रभाव पडत असतो,असे मानसशास्त्र सांगते.माणूस दिवसभरात म्हणजेच २४ तासात अंदाजे साठ हजार विचार करतो असे काही मानसोपचार तद्यांचे मत आहे.आताच्या या कोविड-१९ परिस्थितीमध्ये ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे ,अशा रुग्णांनी कायम सकारात्मक राहणे चांगले कारण सकारात्मकतेमुळे त्यांची तब्बेत लवकर सुधारण्यांस मदत होते.
सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव विचार करून तुम्ही कमी वेळात कोरोना विरुद्धच्या लढाईत विजय मिळवू शकता असे काहींना अभ्यासात लक्षात आले आहे पण त्याच बरोबर आरोग्याची काळजी घेणे आणि नियमित औषध उपचार घेणे देखील गरजेचे आहे. आताच्या काळात अनेक वेळा प्रसारमाध्यमे(बातमी,वर्तमान पत्रे इ.),समाजमाध्यमे(फेसबॉक,व्हाट्स अँप,ट्विटर इ. ) या मध्ये अनेक अफवा आणि निगेटिव्ह गोष्टी जास्त पसरल्या आहेत त्यामळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे तेव्हा कृपया अशा निगेटिव्ह (नकारात्मक) विचारांकडे लक्ष देऊ नका आणि नकारात्मक गोष्टी पसरणार नाहीत याची काळजी घ्या.
कोविड बाधित रुग्णांना आजारी असल्यामुळे आणि नकारात्मक गोष्टी जास्त ऐकू येत असल्यामुळे बरेचदा नैराश्य येते आणि त्यांना या आजारातून बाहेर येण्यास वेळ लागतो अथवा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परंतु हे नराश्य दूर करणे हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे. यासाठी त्याबाधित रुग्णांनी आणि त्याच्या जवळच्या लोकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजारी व्यक्तीला धीर द्यावा कि आपण लवकर बरे व्हाल. रुग्णांनी आजारपणात आपल्या नातेवाईक ,मित्र परिवार याच्या बरोबर संभाषण ठेवावे, आजकाल विडिओ कॉल उपलबध आहेत त्यामुळे संभाषण अधिक चांगले होते. आपल्याला जो छंद आवड असेल ते जोपासावे उदा संगीत,वाचन,गेम खेळणे इ. याचा चांगला फायदा रुग्णांना आपली तब्बेत सुधारण्यात होईल आणि सर्व आनंदी राहतील.
याकाळात आर्थिक जीवनाची घडी विस्कळीत होते हे जरी खरे असले तरी ते तेवढया काळासाठी असते हा विचार मनात ठेवून जास्त ताण कोविड बाधित रुग्णांनी घेऊ नये. तसेच बाधित व्यक्तींच्या नातेवाईक,मित्रपरिवार,ऑफिस मधील लोक यांनी याकाळात माणुसकी दाखवून अशा बाधित व्यक्तींच्या मागे खंबीरपणे उभे राहावे जेणेकरून त्यांचा मानसिक ताण कमी होईल. याकाळात जी आपली गुंवणूकीची पुंजी संपते ती आपण बरे झालो कि पुन्हा नव्याने एका नवीन जोमाने ताकदीने मेहेनत करून कमावू असा सकारात्मक विचार रुगणांनी करावा आणि हे सगळं करण्यासाठी मला लवकरात लवकर बरे व्ह्याचे आहे अशी इच्छा मनात ठेवावी, हीच सकारात्मक इच्छाशक्ती रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत करेल.
एखादा रुग्ण घरात असेल तर रुग्ण आणि घरातील इतर व्यक्तीनीं घरात कोरोनाच संक्रमण होऊ नये यासाठी आरोग्य विभाग आणि सरकारने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे(मास्क वापर,निर्जंतुकीकरण इत्यादी ). प्रशासन यंत्रणा तसेच आरोग्य विभाग यांनी त्यासाठी वेगवेगळ्या सूचना दिल्या आहेत, त्यात रुग्णांनी घ्यायची काळजी आणि रुग्णांबरोबर जे घरातील व्यक्ती आहेत त्यांनी घ्यायची काळजी असे दोंन भाग केले आहेत. रुग्ण आणि घरातील व्यक्ती यांनी वेळोवेळी आपल्या डॉक्टरांशी संपर्क ठेवावा. उपचार नीट पूर्ण करावे कोणती हि हलगर्जी या काळात करू नये.
जर एखादा काम करणारा कर्मचारी बाधित झाला तर त्याच्याशी सौधापूर्ण नाते त्याच्या अधिकाऱ्यांनी,मालकांनी तसेच कामाच्या ठिकाणी असलेल्या मित्रांनी ठेवणे जरुरी आहे. या काळात त्याबाधित व्यक्तीला शक्यतो कामावरून कमी करू नये.शक्य असेल तर त्याला जेवढा पगार असेल तेवढा देण्याचा प्रयत्न करावा कारण या काळात सर्वात जास्त गरज हि पैश्याची असते. बाधित व्यक्तीला त्रास होणार नाही याची जेवढी दक्षता घेता येईल तेवढी घ्यावी. कारण यामुळे याची मानसिकता चांगली राहील आणि ते लवकर बरे होतील.
कृपया सर्वानी कोरोनाबाधित व्यक्तीशी चांगले बोलावे. आज जगभर या आजाराने अनेक लोकांना ग्रासले आहे परंतु एखादा बाधित झाला तर त्याला वाईट वाटेल अशी वागणूक देऊ नये. एखाद्या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले म्हणजे त्यात त्याची काही चूक आहे किंवा त्या व्यक्तीने काही मोठे पाप केला अशा त्याला वागणुकीतून जाणवू देऊ नका अशा कृत्यामुळे बाधित व्यक्ती खचून जाते. एखाद्या व्यक्ती बद्दल अफवा पसरू नका. सामाजिक काळिमा लागेल अशी घटना कुठे ही घडू नये हे आपल्या सर्व समाजाच्या हातात आहे.
रुग्णाचा टेस्ट रिपोर्ट कोविड १९ पॉसिटीव्ह आला आणि जर त्याला काही त्रास होत असेल जसे श्वास घेताना त्रास,दम लागणे,चक्कर येणे इ. तर अशा रुग्णांना हॉस्पिटल मध्ये प्रवेश करून उपचार घ्यावा लागतो. पण जर रुग्णाची स्थिती चांगली असेल आणि त्याला काही त्रास होत नसेल अशा रुग्णांसाठी घरी राहून उपचार घेण्याची परवानगी प्रशासनाने आता दिली आहे यासाठी एक पूर्वनियोतित प्रणाली प्रशासनाने ठरवून दिली आहे त्याचे पालन करून ज्यांना त्रास नाही पण रिपोर्ट पॉसिटीव्ह आहे असे वैद्यकीय सल्ला घेऊन घरी उपचार घेऊ शकतात. परंतु हॉस्पिटल मध्ये प्रवेश करायचे असेल किंवा घरी उपचार घ्यायचे असतील तर योग्य वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर ह्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टीसाठी नियम प्रशासनांने दिले आहेत.
आपल्याला कोविड रुग्णांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना मदत करावी लागेल. अशा रुग्णांच्या मदतीसाठी आपण बर्याच गोष्टी करू शकतो आणि त्या करणे आपले सामाजिक कर्तव्य आहे. आम्ही सर्वजण एकत्र येऊ आणि आम्ही या साथीच्या आजाराविरुद्ध लढू आणि या परिस्थितीतून सुखरूप बाहेर येऊ हाच विचार प्रत्यकाने मनात ठेवावा . एकाच गोष्ट लक्षात ठेवा या कोविड परिस्थितीतून सर्वांनी लवकर बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे सकारात्मक मानसिकता. केवळ सकारात्मक दृष्टीकोनच या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करेल. शारीरिक आरोग्य तसेच निरोगी मन राखण्यासाठी योग हा एक उत्तम मार्ग आहे. आपल्या प्रियजनांशी संपर्क साधल्यास बर्याच लोकांना सुरक्षित आणि सक्रिय राहण्यास मदत होते. प्रतिकारशक्ती वाढविणे, शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूंनी या साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी आणि त्यामधून सामर्थ्यवान व्यक्ती म्हणून बाहेर पडण्याचा एक संभाव्य प्रयत्न असू शकतो.
Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of
everything.