आज आपण पाठदुखी या विषयावर थोडी माहिती घेऊ तसेच पाठदुखीची सामान्य कारणे व पाठदुखी पासून बचाव करण्याचे मार्ग,निदान पद्धती आणि ऊपचार याची देखील थोडक्यात माहिती घेऊ.
मुरगळणे किंवा लचक भरणे :-
जड वस्तू उचलण्यामुळे,झोपेत चुकीच्या पद्धतीत वळणे किंवा चुकीच्या शारीरिक हालचाली यामुळे हि समस्या उध्दभवू शकते.
मणक्याच्या संबंधित व्याधी :-
पाठीच्या मणक्याच्या संबंधित ज्या समस्या असतात उदा. मणक्यात गॅप होणे, मणक्यातील डिस्क सरकणे ई.
संधिवात :-
वृद्धत्वामुळे हाडे खराब होणे ही एक सामान्य गोष्ट आहे, ज्यास इंग्रजीमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात.काही महिलांमध्ये सांधेदुखीचा त्रास असतो त्या परिथितीत देखील पाठदुखी होऊ शकते.
ऑस्टिओपोरोसिस:-
ऑस्टिओपोरोसिस हाडे कमकुवत झाल्याने हा आजार होऊ शकतो किंवा जास्त काळ स्टिरॉइड्स औषधांचे सेवन केल्याने देखील होऊ शकतो.
कधी कधी फार क्वचित वेळा किडनी स्टोन, टीबी किंवा इन्फेकशन आजारामुळे पाठदुखी होऊ शकते.
पाठदुखी हा एक सामान्य आजार आहे बाकी आजारांप्रमाणेच वेळेवर निदान केल्याने पाठदुखीचीसमस्या लवकर बरी होऊन दीर्घकालीन गुंतागुंत टाळता येईल.बऱ्याचदा असे समजले आहेत रुग्ण याकडे दुर्लक्ष करतात किंवा वेदनाशामक औषधे डॉक्टरांना न विचारता घेतात आणि आजार वाढतो त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.म्हणूनच म्हणतात ,"Prevention is better than cure"
धन्यवाद,
Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of
everything.