औषधाप्रतिनिष्ठा

04 December, 2020

औषधाप्रतिनिष्ठा


नमस्कार,

मित्रांनो आपण आज पर्यंत विविध विषयांवर चर्चा केली आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करूया ते म्हणजे "औषध-ऊपचारांप्रती निष्ठा". बऱ्याचदा अनेक रुग्ण हे औषध वेळेवर घेत नाहीत,काहींना कामाच्या व्यस्त वेळातून औषध घेणे विसरतात आणि कधी कधी खूप तणावाच्या परिस्थितीमुळे देखील औषध घेणे टाळतात किंवा राहून जाते. चला तर मग पाहूया औषध वेळेवर न घेण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि औषध वेळेवर कसे घ्यावे याची नियोजन पद्धती. कधी कधी रुग्ण बऱ्याच चुका औषध घेताना करतात, जसे डॉक्टरना न विचारता स्वतःहून औषध घेणे बंद करणे किंवा कमी औषध घेणे.औषध घेण्याच्या वेळेत बदल करणे ई. यामुळे जे रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या रुग्णांना खूप घातक आजारांना सामोरे जावे लागू शकते जसं हृदय विकार, पक्षघात,अर्धांग वात ई, कधी कधी तर हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्यावे लागते.

रुग्णांकडून औषध घेताना होणाऱ्या चुकांची कारणे
  • अति कामाचा ताण असतो तेव्हा रुग्ण औषध वेळेत घ्यायला विसरतात.
  • औषध आणि तपासणीच्या जास्त किंमती कधी कधी रुग्णांना आर्थिक दृष्टीने परवडत नाही.
  • काही रुग्णांना वाटतं की औषध घेतले तर माझ शरीर कमजोर होईल.
  • कधीकधी इंटरनेट वर काही माहिती वाचून रुग्ण औषध घेणे बंद करतात.
  • काही रुग्ण नातेवाईकांनी सांगितलेल्या चुकीच्या माहीती आधारे डॉक्टरांनान विचारता औषध बंद करतात.

आम्ही आपल्याला असे काही उपाय सुचवतो ज्यामुळे औषध वेळेवर घेतले जाईल आणि उपचार सुद्धा चांगले चालू राहतील.

  • कौटुंबिक मदत असेल तर आपले आप्तजन आपल्याला औषध घायची वेळ झाली की आठवण करून देतात त्यामुळे हा खूप चांगला उपाय आहे.
  • बऱ्याचदा औषध महाग असतील आणि आपण डॉक्टर बरोबर चर्चा केली तर आपले डॉक्टर त्या औषधाला पर्यायी औषध देतात जे स्वतः आणि रुग्णला परवडेल.
  • जर रुग्णांना अनेक आजार असतील आणि औषध जास्त वेळा घ्यायच असेल तर अशावेळी डॉक्टर प्रयत्न करतात की कॉम्बिनेशन मध्ये औषध द्यावे जेणेकरून गोळ्यांची संख्या कमी करता येईल
  • आजकाल जवळपास सर्वांकडे मोबाईल असतो तेव्हा मोबाईल रिमंडर सेट करून औषध वेळेवर घेऊ शकतो.
  • जर काही शंका असतील, जसे औषध कधी घ्यावे,कसे घ्यावे प्रमाण किती असावे आणि कितीवेळाघ्यावे तर आपल्या डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करावी.
  • "डेली डोस कंटेनर" आता हे कंटेनर एक वरदान आहे. यात आपण आपले औषध व्यवस्थित वेगळे करून ठेवू शकतो जेणेकरून आपण औषध विसरणार देखील नाही आणि सर्व औषध वेळेत घेतली जातील.

आशा नवीन आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण औषध वेळेवर घेऊ शकतो आणि अनेक समस्यांना तोंड देण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. औषध उपचार योग्य आणि चांगल्याप्रकारे घेणे ही डॉक्टर, रुग्ण आणि त्यांचे जवळचे नातेवाईक फॅमिली मेंबर यांची एकत्रित जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा,मस्त राहा आणि औषध वेळेत घेत राहा.

धन्यवाद,

स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा
Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.