नमस्कार,
हायपोग्लायसेमिया म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे. मधुमेह असणाऱ्या रुग्णांची ही नेहमीची तक्रार असते की माझी शुगर लेव्हल अधून मधून कमी होते. आज आम्ही तुम्हाला काही अशा सोप्या गोष्टी सांगू ज्यातून आपण हायपोग्लायसेमिया पासून आपला बचाव आणि खबरदारी घेऊन पुढील त्रास टाळू शकतो. ग्लुकोज आपल्या शरीरातील ऊर्जेचा महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा शरीरातील शुगर लेव्हल ७०mg/dl पेक्षा कमी होते तेव्हा त्याला हायपोग्लायसेमिया किंवा low sugar असे म्हणतात.
हायपोग्लायसेमियाची लक्षणे
- हात कापणे
- जास्त भूक लागणे
- खूप घाम येणे
- छातीत धडधड होणे
- जर 50mg/dl पेक्षा जास्त शुगर खाली गेली तर सिरीयस न्यूरॉलॉजीकल लक्षणे दिसून येतात ( विस्मृती, धुरकट दिसणे,सीझर, बेशुद्ध पडणे ई.)
हायपोग्लायसेमिया हा मधुमेह असलेले रुग्ण किंवा ज्यांना सुलफोनयलूरेअस औषध चालू आहेत अशांमधे दिसून येतात. त्याच बरोबर मधुमेह असणारे रुग्ण ज्यांना किडनी आणि लिव्हरचे आजार आहेत अशा लोकांमध्ये सुध्दा सामान्यतः हायपोग्लायसेमिया असल्याचे दिसून येते.
हायपोग्लायसेमियाची कारणेे
- जेवण न करणे किंवा वेळेवर न करणे.
- जेवण कमी करणे
- खूप जास्त व्यायाम करणे. काही वेळा मधुमेह नसताना देखील हायपोग्लायसेमियाचा त्रास होतो त्या कोणत्या ते पण पाहू
- जास्त मद्यपान
- किडनी किंवा लिव्हर इन्फेक्शन
- खूप जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार होणे.
- हार्मोनल
- शरीरात जास्त प्रमाणात कर्बोदके खाल्याने जास्त प्रमाणात इन्सुलिन निर्मिती होणे.
काही वेळा हायपोग्लायसेमिया असूनही अशा रूग्णांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. याला “HYPOGLYCEMIA UNAWARENESS” म्हणतात. हे जास्त धोकादायक ठरू शकते कारण लक्षणे नसल्याने योग्य वेळी ट्रीटमेंट होत नाही त्यामुळे रुग्णाचे अवयव डॅमेज होण्याची शक्यता असते. यातून वाचण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे नियमित शुगर तपासणी करणे.
हायपोग्लायसेमिया पासून बचाव करण्यासाठी काही टिप्स
- जेव्हा शुगर कमी होते तेव्हा डॉक्टर सल्ला देतात की अर्धा तासानी परत शुगर लेव्हल तपासा आणि जर तरी सुध्दा शुगर कमी असेल तर लगेच डॉक्टरला संपर्क साधा.
- लक्षणे दिसतात एक ग्लुकोमीटर घेऊन शुगर लेव्हल तपासा. त्यानंतर २०-३० ग्रॅम ग्लुकोज म्हणजे घरातील 4 चमचे ग्लुकोन डी पाण्यात मिसळून सेवन करावे. जर घरी ग्लुकोज पावडर नसेल तर साखर, जूस ,चॉकलेट किंवा ग्लुकोज बिस्कीट खावे.
- काही वेळेस जास्त शुगर कमी झाली तर रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो अशा वेळी नातेवाईकांनी लगेच रूग्णाला जवळच्या रुग्णालयात दाखल करावे जेणेकरून त्यांना सलाईनद्वारे ग्लुकोज देता येते
- काही वेळेस लगेच ग्लुकागान हे इंजेक्शन लगेच देण्याचा सल्ला दिला जातो कारण हे इंजेक्शन नातेवाईक किंवा डॉक्टरांना सहजपणे देता येतं पण हे इंजेक्शन वापरण्यापूर्वी उपचार घेत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- आपल्या मधुमेहाची औषध आणि जेवण यांच्या वेळेचा समतोल राखावा
- आपली शुगर तपासणी आणि डॉक्टरचा फॉलोअप व्यवस्थित ठेवा.
- ज्यांना खूप जास्तवेळा वारंवार हायपोग्लायसेमियाचा त्रास होतो त्यांनी CONTINUOUS GLUCOSE MONITORING चा वापर करा. CGM हे असे साधन आहे ज्याला तुमच्या पोटावर किंवा हाताच्या दंडावर फिक्स करतात ज्यामुळे सारखं सारखं सुई न टोचता शुगरचे रिडींग मिळतात.
कधी कधी असं पाहण्यात आले की थकवा, चक्कर किंवा घाम आला तर लोक असं समजतात की त्यांना हायपोग्लायसेमियाचा त्रास होतो आहे असा समज करून घेतात तेव्हा हायपोग्लायसेमियाला घाबरून जाऊ नका पण काळजी नक्कीच घ्या आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. स्वस्थ राहा,मस्त जगा.