नमस्कार मित्रांनो ,
आनंदी राहणे सर्वांना आवडते,असे कोणी आहे का ज्यांना आनंद नको आहे ? माझ्या माहितीत तरी नाही. बर गंमतीचा भाग सोडा पण आनंदी राहण्यासाठी सगळे सल्ले देतात कोणी सांगत हसत राहा,कोणी सांगत विचार करू नका पण प्रत्यक्षात मात्र आनंदी राहणे हे खूप वेगळ आहे. आनंदी राहायच असेल तर सकारात्मक विचार कायम ठेवावा लागतो. एका सर्वेक्षणानुसार असे लक्षात आले की माणूस एका दिवसात ६० ते ६५ हजार वेळा विचार करतो आणि त्यातील ८० ते 90 % विचार हे नकारात्मक असतात,यावरून आता आपल्याला समजल असेल की सकारात्मक विचार हे किती महत्त्वाचे आसतात.
आता आपण पाहू नेहमी सकारात्मक राहण्यासाठी काही टिप्स
- नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका.
- कोणतेही काम असेल ते मी चांगलेच करून असा आत्मविश्वास ठेवा.
- एकमेकांना समजून घ्या आणि एकमेकांना कायम मदत करा.
- कधी गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तर त्यांचा जास्त विचार करत बसू नका.
- वेळेचे आणि कामाचे योग्य नियोजन करा,त्यामुळे आपला ताण कमी होईल
- निराश वाटले तर आपल्या जवळच्या मित-मैत्रिणीशी बोला,आपले छंद जोपासा जेणेकरून आपले मन शांत होईल.
- कठोर परिस्थितीमधे खचून जाऊ नका मनातील उत्साह कायम ठेवा.
- कायम आशावादी राहा जसे हिंदीमधे म्हणतात ”हार के बाद जित है”
- दिवसातून थोडा वेळ काढून योगा/प्राणायाम/मेडिटेशन ई करा.
मित्रांनो हे सगळे एका दिवसात किंवा एका मिनिटात होणार नाही यासाठी आपल्याला या सवयी जोपासाव्या लागतील पण हे एकदा केले की तुमचा पुढील मार्ग सोपा नक्की होईल. सगळ्या गोष्टीची वेळ यावी लागते आपणसकारात्मक प्रयत्न करत राहिले पाहिजेत,” देर है अंधेर नाही” एवढेच लक्षात ठेवा. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत मजेत राहा.