नमस्कार,
संगीत हे सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे.बरेचजण आयुष्यातील चांगल्या अथवा वाईट गोष्टी घडत असताना संगीताचा सहारा घेणे पसंत करतात,म्हणूनच आज आपण माहिती करून घेऊ संगीत आपल्या आरोग्यावर काय परिणाम करते आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होतो.
संगीताचा आपल्या आरोग्यावर परिणाम कसा होतो?
जेव्हा आपण दुखी असतो तेव्हा आपल्या शरीरात कोर्टेसोल नामक हार्मोनची निर्मिती जास्त प्रमाणात होते ज्यामुळे डिप्रेशन,हृदय विकार,ताण ई आजार होऊ शकतात. संगीत या कोर्टेसोल हॉर्मोनच्या पातळीला कमी करतात आणि डोपेमीन हॉर्मोनची पातळी वाढवते ज्यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटते आणि आपला मूड देखील चांगला होतो. आपल्या मेंदूत जिथून दुखण्याचे संकेत जातात तिथूनच संगीताचे संकेत सुद्धा जातात आणि जेव्हा हे दोन्ही एकमेकांसमोर येतात तेव्हा एका अभ्यासात असे समजले कि संगीताचे संकेत हे वेदना देणाऱ्या संकेतांना कमी करतात आणि दुखणे कमी होते. एका सर्वेमधून असे देखील समजले आहे कि जे लोक लहानपणी संगीत शिकतात किंवा संगीत ऐकतात त्यांना वृद्धपकाळात डिप्रेशन किंवा इतर मानसिक आजार कमी होतात.जेव्हा आपण झोपताना शांत संगीत ऐकतो तेव्हा आपल्याला चांगली झोप लागते आणि आपण सकाळी तरतरीत असतो.काही अभ्यासात असे समजले कि पॅरालिसिस किंवा स्ट्रोक रुग्णांना संगीत थेरपी दिली तेव्हा त्याच्यात लवकर सुधारणा होण्यास मदत झाली. संगीत ऐकल्याने आपल्या शरीरातील इम्युनोग्लोबुलीन “A” हि पातळी सुधारते आणि निरोगी आयुष्य मिळायला मदत होते.
संगीताचे आरोग्य विषयक फायदे
- तणावातून मुक्ती
- सहिष्णुता सुधारते
- स्मृती सुधारते
- उदासीनता दूर करण्यास मदत होते
- चांगली झोप लागण्यास मदत होते
- स्ट्रोक रुग्णांमध्ये सुधारणा होते.
- लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवते
- प्रतिकार शक्ती वाढवते
- मानसिक आणि सार्वजनिक संबंध सुधारण्यास मदत होते
वरील विषयासंबधित अधिक माहितीसाठी या लिंकला क्लिक करा –
https://www.youtube.com/watch?v=o1Mtvw30Frc
आमच्या चॅनेलची लिंक –
https://www.youtube.com/channel/UCohPsgu-BWZB1c82D0nmcwQ