नमस्कार,
रक्तक्षय(Anemia) हा एक प्रमुख आजार आहे. राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षणानुसार ६०% लहान मुले आणि ५०% महिला या आजाराने त्रस्त आहेत,यावरून या आजाराची व्याप्ती किती आहे ते लक्षात येते.आज आपण या विषयी थोडी माहिती पाहू.
रक्तक्षयाची कारणे
रक्तक्षय या आजारामध्ये शरीरातील रक्त कमी होते आणि याचे प्रमाण हे रक्तातील हिमोग्लोबिन पातळी वरून समजते.
१) न्यूट्रिशनएनीमिया – शरीरातील काही घटक कमी होतात जसेकी जीवनसत्त्वे,खनिजे तेव्हा हा आजार होऊ शकतो.
२) रक्तक्षय – मूळव्याध, फिशर, अल्सर सारख्या आजारामध्ये शरीराततुन रक्त बाहेर पडते त्यावेळी हा आजार होतो.
३) बोनमेरो – शरीरात हिमोग्लोबिन निर्मिती ही हाडातील बोनमेरो याभागातून होते ती निर्मिती कमी झाली तरीदेखील हा आजार होतो.
४) क्रोनिकडिसीझ – किडनीबिघाड, लिव्हरबिघाड, अर्थरायटीस आशाकाही आजारात देखील ऍनिमिया होऊ शकतो.
रक्तक्षयाची लक्षणे
- चक्करयेणे
- शरीरजडवाटणे
- अस्वस्थता
- शारीरिकहालचालकमीहोणे
- थकवा
- श्वासघेण्यासत्रासहोणे
रक्तक्षय चाचणी
- सी.बी.सी.
- या काही विशेष चाचणीद्वारे सुद्धा निदान करतात (serum FERRITIN,iron studies, Vitamin b12 , Stool routine, Hb electrophoresis)
- कधी कधी इंडोस्कोपी आणि पोटाची सोनोग्राफी करतात.
रक्तक्षयाची उपचारपद्धती
रक्तक्षयावर उपचार करताना सर्वात पहिले म्हणजे योग्य पोषक आहारयावर लक्ष दिले जाते,जसेगूळ, लालमास,खजूर, अंड्याचाबलक, बिटयांचा वापर करतात. काही रुग्णांना रक्तातील लोहाचे प्रमाण वाढण्यासाठी औषधे दिली जातात.
जर आहार आणि औषध घेऊन सुद्धा फरक नाही पडला तर इंजेक्शन द्वारे लोह देतात.काही विशिष्ट आजार,अपघात आणि शस्त्रक्रिया केल्यावर बरेच रक्त शरीरा बाहेर पडते त्यावेळी बाहेरून रक्त दिले जाते.
तर ही होती रक्तक्षय आजराविषयी थोडी माहिती जाता जाता एवढंचकी संतुलित आहार घेतल्याने हिमोग्लोबिन पातळी सुधारता येते आणि थोडा जरी त्रास वाटला अथवा लक्षणे दिसून आली नाहीत पण चाचणीत हिमोग्लोबिन कमी असेल यात लगेच आपल्या डॉक्टरना संपर्क करा.