नमस्कार,
मित्रांनो आज आपण “डोळ्यातील कोरडेपणा (DRY EYES)” या विषयी थोडी माहिती घेऊया. तुम्हाला कधी डोळे लाल होणे,डोळ्यात कचरा अडकला आहे किंवा डोळे निस्तेज झाले आहेत असं वाटतं का ? जर असं वाटत असेल तर आपल्या डोळ्यांना ड्राय आईझ हा आजार झाला असू शकतो. ही सर्वसाधारण लक्षणे या आजाराची आहेत.एका सर्वेक्षणात असे दिसले आहे की भरतात ड्राय आईझ चे ३० ते ३५ % रुग्ण आहेत.चला आता आपण थोडक्यात अधिक माहिती यासंबंधी पाहु.
आपल्या डोळ्यातील समोरच्या बाजूला एक दृष्टीपटल (TEAR FILM) असते ज्याच्यात तीन आवरणे असतात. सर्वात बाहेर लीपड आवरण असते,मधलं आवरण पाण्याचे असते आणि सर्वात आत मधलं आवरण म्युसिन असतं. हे डोळ्यांला ऑक्सीजन पुरवतो आणि डोळ्याचे रक्षण करतो. बाहेरचं आवार जे लिपिडचेअसतं ते डोळ्याच्या पापण्यामधील मेंबोमेन ग्लंडमधे तयार होते जर हे लीपड हवं तेवढ्या प्रमाणात तयार झालं नाही किंवा हवं तेवढ डोळ्याला पुरवले गेले नाही तर डोळ्यातील दुसऱ्या अवरणातील पाणी बाहेर पडते त्यामुळे डोळ्याला खाज येणे,लाल होणे आणि डोळे कोरडे पडणे अशी लक्षणे रुग्णांमधे दिसू लगतात. जर आपण या आजाराकडे दुर्लक्ष केले तर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, जसे कि डोके दुखी, कॉन्टॅक्ट लेन्स सहन न होणे,वाहन चालवताना त्रास होणे, डोळे उघडबंद करताना त्रास होणे, डोळ्याच्या समोरच्या भागावर जखम होणे इ समस्या उद्भवू शकतात. जर काही लक्षणे दिसली तर लगेच आपल्या डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटा.
ड्राय आईझची सर्वसामान्य कारणे
- वय ५० पेक्षा जास्त.
- मासिक पाळी बंद होण्याच्या स्थितीतील महिला.
- जास्त वेळ डिजिटल काम.
- काही आजार असणाऱ्या व्यक्ती (मधुमेह,रक्तदाब,थायरॉईड,लुपस, अर्थरायटीस ई.)
- स्पेशल औषधे चालू असणे(हायपर टेन्शन/डिप्रेशन ई)
- कायम लेन्सचा वापर करणे.
- जास्त नंबरचा चष्मा घालवण्याचे ऑपरेशन.
ई काही सामान्य कारणामुळे ड्राय आईझ आजार होऊ शकतो.
ड्राय आईझ पासून बचाव करण्यासाठी सात सोपे उपाय
- धूळ, माती अश्या ठिकाणी जाताना चष्म्याचा वापर करा
- आपला जर स्क्रिन टाइम जास्त असेल तर तो कमी करायचा प्रयत्न करा व ब्राईटनेस कमी ठेवा. आजकाल इलेक्ट्रॉनिक वस्तुमध्ये ब्लू लाईट फिल्टर चा ऑप्शन आहे त्याचा वापर करा.
- घरातील फॅन, एअर कंडिशनर, हेअर ड्रायर हे डायरेक्ट डोळ्यावर येणार नाहीत याची काळजी घ्या.
- धूम्रपान, मद्यपान आणि कोल्ड्रिंक्स घेऊ नका
- डोळ्यांसाठी पाणी खूप आवश्यक आहे तेव्हा दिवसातून ७-८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे
- ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे सेवन करणे चांगले आहे.
- चांगली झोप देखील डोळे चांगले राहण्यासाठी आवश्यक आहे.
सर्व काळजी घेऊन देखील ड्राय आईझची लक्षणे दिसली तर डॉक्टर या आजाराची ट्रिटमेंट करतात त्यात लुब्रिकेटिंग आय ड्रॉप देतात,काही रुग्णांना या ड्रॉप मधील संरक्षक घटकांमुळे त्रास होतो आशा रुग्णांना वेगळे आय ड्रॉप दिले जातात. जर ड्रॉप देऊन देखील फरक पडला नाही तर ऍडव्हान्स ट्रीटमेंट देतात. तर ही होती ड्राय आईझ म्हणजेच डोळ्यातील कोरडेपणा याविषयी माहिती पुनः भेटू एक नवीन विषय घेऊन. “तुमची निरोगी दृष्टी ही आमची जबाबदारी”