नमस्कार,
जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगभरातील मानसिक आरोग्याच्या समस्यांविषयी जागरूकता वाढविण्याचे आणि मानसिक आरोग्याच्या समर्थनार्थ प्रयत्नांना एकत्रित करण्यासाठी साजरा केला जातो. मानसिक आजार हा जगाच्या सार्वजनिक आरोग्यासमोरचे सर्वांत मोठे आव्हान ठरत आहे.दर शंभर जणांमागे सहा जण या मानसिक व्याधीने ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती काही ठिकाणी केलेल्या अभ्यासातून समोर येत आहे.वयाच्या कोणत्याही वर्षी हा आजार घेरत असल्याने मनोरुग्णांच्या वाढत्या संख्येवर जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील चिंता व्यक्त केली जात आहे.वैद्यकीय परिभाषेत ढोबळमानाने स्किझोफ्रेनिया, नैराश्य, चिंतारोग, व्यसनाधिनता असे मानसिक अनारोग्याचे प्रमुख चार प्रकार सांगितले जातात. याखेरीज वयाच्या विविध टप्प्यांवर होणाऱ्या या मानसिक आरोग्याचे आणखीनही प्रकार आहेत.
जागतिक मानसिक आरोग्य दिनाचा थोडक्यात इतिहास आणि कसा साजरा केला जातो ?
जागतिक मानसिक आरोग्य दिन १० ऑक्टोबर १९९२ रोजी प्रथमच साजरा करण्यात आला. वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थचा वार्षिक उपक्रम म्हणून तत्कालीन उपसचिव सरचिटणीस रिचर्ड हंटर यांनी याची सुरूवात केली. दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जातो. सुरुवातीस हा दिवस साजरा करण्याची कोणतीही विशिष्ट संकलपना नव्हती.परंतु १९९४ मध्ये तत्कालीन सरचिटणीस युजीन ब्रोडी यांच्या सूचनेनुसार जागतिक मानसिक आरोग्य दिन पहिल्यांदा संकल्पाने सह साजरा करण्यात आला. ती संकल्पना होती “जगभरातील मानसिक आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारणे”.मानसिक आरोग्याच्या मुद्द्यांविषयी जागरूकता वाढविणे हा मूळ उद्देश जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यामागे आहे.
चांगले मानसिक आरोग्य टिकवणासाठी काही साधे उपाय
आपल्या भावना व्यक्त करा –
आपल्या भावना व्यक्त केल्यामुळे आपण चांगले मानसिक आरोग्य टिकवून ठेवू शकतो . जेव्हा आपण अस्वस्थ होतो तेव्हा कोणाशीतरी बोलल्यामुळे अनेक कठीण प्रसंगांना आत्मविश्श्वासाने सामोरे जाण्यास मदत होते.
सक्रिय रहा –
नियमित व्यायामामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि तुम्हाला मन एकाग्र होणे, झोप शांत लागणे आणि आजारातून बरे होण्यास मदत मिळते. व्यायामामुळे मेंदू आणि इतर महत्वाचे अवयव निरोगी राहतात आणि तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण फायदा होतो.
चांगले पौष्टिक अन्न खावे –
आपल्या शरीरातील इतर अवयवांप्रमाणेच निरोगी राहण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी आपल्या मेंदूला पोषक तत्त्वांचे मिश्रण आवश्यक आहे. आपल्या शारीरिक आरोग्यासाठी चांगला आहार आपल्या मानसिक आरोग्यासाठी देखील चांगला असतो.
समजूतदारपणाने वागा –
आपला मूड बदलण्यासाठी आपण बर्याचदा मद्यपान करतो. काही लोक भीती किंवा एकटेपणाचा सामना करण्यासाठी मद्यपान करतात, परंतु त्याचा परिणाम केवळ तात्पुरता असतो आणि नुकसान जास्त होते म्हणून समजूतदारपणाने वागा
संपर्कात रहा –
एखाद्याला आताच्या व्यस्त जीवनामुळे समोरासमोर भेटणे शक्य नाही, परंतु कधीतरी वेळ काढून एकमेकांना जरूर भेटा . आपण त्यांना कॉल देखील करू शकता, त्यांना एक मेसेज पाठवू शकता किंवा त्याऐवजी ऑनलाइन व्हिडीओ चॅट देखील करू शकता. पण संवाद निरंतर आणि चांगला असणे महत्वाचे आहे .
नेहमी मदत करा –
आपल्यापैकी कोणीही स्वयंपूर्ण नाही. आपण कधी कधी संकटात येतो किंवा एकटे पडतो तेव्हा आपल्याला आपले मित्र मदत करतात त्याच प्रमाणे कधी तुम्हाला असे वाटेल कि आपली एखादी व्यक्ती त्रासात आहे त्यावेळी त्या व्याक्तीला जेवढी शक्य आहे तेवढी मदत नक्की करा. मदत केल्याने ताण हलका होतो.
एक विश्रांती घ्या –
कोणतेही काम करताना मग ते घरघुती असो,वैयक्तिक असो,कार्यालयीन असो काही वेळ विश्रांती घ्या. सतत विश्रांती न घेता काम केले तर त्याचा शारीरिक आणि पर्यायाने मानसिक ताण वाढतो, म्हणून थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा.
आपण कोण आहोत ते ओळखा आणि स्वीकारा –
सर्व व्यक्ती वेगवेळ्या आहेत. आपण दुसऱ्यासारखे बनावे यापेक्षा आपण एक चांगली व्यक्ती आहोत आणि आपल्यातील चांगले गुण अधिक कसे वाढवता येतील ते मान्यकरून पुढील वाटचाल करावी.जेव्हा आयुष्यात एखादे कठीण वळण येते तेव्हा आपला चांगला आत्म-सन्मान आपल्याला ती कठीण वेळ सहन करण्याची ताकद देतो. तेव्हा इतरांशी तुलना करणे सोडा आणि स्वतः कडे लक्ष द्या.
इतरांची काळजी घ्या –
‘मित्र खरोखर महत्वाचे आहेत.जेव्हा जमेल तेव्हा आम्ही एकमेकांना मदत करतो, म्हणून मैत्री हा एक दुतर्फा मार्ग आहे . तेव्हा एकमेकांची मदत करून आयुष्तात आनंदी राहा आणि पुढे चला.तर मित्रानो आज आपण थोडक्यात जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि मानसिक आरोग्य कसे जपावे याची संक्षिप्त माहिती मिळवली. लवकरच अजून अश्या अनेक वेगवेगळ्या विषयावर आपण जरूर प्रकाशझोत टाकू तोपर्यंत रजा द्या आणि आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवा.