नमस्कार,
बाल दिन हा एक खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरुन २० नोव्हेंबर हा जागतिक बाल दिन अनेक देशांत साजरा होतो. भारतात,भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (१४ नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. मुले काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षक यांनी पाहिले पाहिजे. त्यांनी मुलांना ‘देवाघरची फुलेʼ मानली. ती बागेतल्या फुलांच्या कळीप्रमाणे असतात. त्यांना प्रेमाने व काळजीने हाताळली पाहिजेत; कारण बालकांमध्येच देशाचे भवितव्य दडलेले आहे; देशाची खरी शक्ती व समाजउभारणीचा पाया बालकेच असतात, असे ते म्हणत.मुलांचा हक्क, काळजी आणि शिक्षणाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी बालदिन संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
मुलांमध्ये नेहरू “चाचा नेहरू” म्हणून ओळखले जातात, त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले पाहिजे यासाठी त्यांनी वकिली केली.नेहरूंनी मुलांना राष्ट्राची खरी शक्ती आणि समाजाची पायाभूत संस्था मानली यादिवशी,अनेक शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम मुलांद्वारे आणि मुलांसाठी भारतभर आयोजित केले जातात.
बाल दिनाची प्रमुख उद्दिष्टे
- बालकांच्या गरजा व हक्क यांविषयी जाणीवजागृती करणे.
- बालकल्याणकारी योजना वाढीस लावणे.
- बालकांमध्ये सांप्रदायिक व सांस्कृतिक देवाणघेवाण करणे.
- बालकांमध्ये विविध पंथ वा धर्मांबाबत संहिष्णुता निर्माण करून सामंजस्याची भावना वाढीस लावणे.
- जगभरातील मुलामुलींमध्ये बंधुभाव वाढीस लावणे.
- बालकांचे बालपण अधिक समृद्ध बनवणे.
- बालकांमध्ये “विश्वकुटुंबाची”संकल्पना वाढीस लावणे.