नमस्कार मित्रांनो ,
आपल्याला माहीत आहे का आपण फक्त चाललो तरी एक निरोगी आणि छान आयुष्य जगू शकतो,म्हणूनच आज आपण पाहूया नियमित चालण्यामुळे आपल्याला काय फायदे मिळतात .
१) वजन आणि अतिरिक्त चरबी कमी होते:- नियमित चालल्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिन पातळी नियंत्रित होते आणि अतिरिक्त चरबी कमी होते.
२) हृदय आणि रक्तवाहिन्या चांगल्या राहतात:-चालण्याचा एक प्रकार आहे ज्यात काही वेळ थांबून परत नियोजित वेळेपर्यंत चालले तर कॅलरीज कमी होतात आणि हृदय चांगले रहायला मदत होते.
३) आजारापासून रक्षण:-रक्तदाब,मधुमेह, हृदयाचे आजार, कोलेस्टेरॉल, थायरॉईड, व्हेरिकोज व्हेन्स ई आजार होण्याचे प्रमाणात कमी होते किंवा हे आजार असतील तर त्यावर नियंत्रण ठेवण्यात मदत मिळते.
४) पचनक्रिया सुधारते:-नियमित चालण्यामुळे आपल्या आतड्याची हालचाल सुरळीत राहते त्यामुळे अन्नपचन चांगले होऊन गॅस, ऍसिडिटी अशा पचन संबंधित त्रास कमी होतात.
५) शारीरिक ऊर्जा नियमित चालण्याने वाढते त्यासाठी 30 मिनिटे रोज चालणे महत्त्वाचे आहे.
६) झोप चांगली येते:- चांगली झोप मिळणे ही आपल्या शरीराची एक महत्त्वाची गरज आहे. मेलाटोनिनची पातळी चालण्याने वाढते आणि चांगली झोप आपल्याला मिळते.
७) प्रतिकार शक्ती वाढते:-आजच्या काळात प्रतिकार शक्ती चांगली राहणे गरजेचे आहे.चालण्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
८) मानसिक ताण कमी होतो:-आणि मज्जासंस्था सुधारते.
९) स्मरणशक्ती वाढते:-जर्नल ऑफ एक्सपरिमेंटल सायकॉलॉजी यांच्या अभ्यासानुसार असे म्हणणे आहे की नियमित चालण्याने क्रीटीव्हीटी वाढते आणि त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते व अल्झायमर,डिमेनशिया असे आजार होण्याचे प्रमाण कमी होते.
१०) हाडे आणि सांधे मजबूत होतात:-चालण्याने आपल्या शरीराच्या स्नायू मधील रक्त प्रवाह चांगला होतो ज्यामुळे सांधे आणि हाडे मजबूत होतात ज्यामुळे संधिवात किंवा अपंगत्व येण्याचे प्रमाण कमी होते.
चालणे सुधारण्यासाठी काही टिप्स
- डोक सरळ ठेवून समोर पाहून चला,खाली पाहून चालू नये.
- चालताना आपली पाठ, मान आणि खांदा व्यवस्थित असला पाहिजे.
- चालताना पोटाचे स्नायू आणि खांदा ताठ असला पाहिजेे
- चालताना शूज आणि कपडे कम्फर्टेबल असावे.
- चालण्याची जागा चांगली आणि सरळ असावी.
- 30 मिनिटे चालताना 10,000,000 5 मिनिटे हळू चला आणि मग हळूहळू स्पीड वाढवा आणि परत शेवटच्या 5 मिनिटांमध्ये हळूहळू स्पीड कमी करणे चांगले.
- चालण्यानंतर स्ट्रेचिंग करून स्नायूना होणारी इजा आपण टाळू शकतो.
- चालण्याच्या व्यायामाला मजेदार बनव्यासाठी आपण चालताना संगीत किंवा प्रेरणादायी ऑडिओ पुस्तक ऐकू शकतो. तर आपण पाहिलं चालण्याचे किती फायदे आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे हा एक सर्वात स्वस्त एरोबिक व्यायाम आहे. तेव्हा आज पासून निश्चिय करा आणि नियमित चालून आपले शरीर आणि मन निरोगी ठेवा. पुन्हा भेटू लवकरच नवीन विषय घेऊन.