नमस्कार,
आज आपण चक्कर येणे या विषयावर चर्चा करू,जगात २०-३० % लोकांना चक्कर येणे हा त्रास असतो. चक्कर येणे हा आजार असा आहे कि याला कारणे अनेक असतात आणि याची लक्षणे सुद्धा वेगळीवेगळी असतात. चक्कर हि एक तर छोट्या-मोठ्या मानसिक कारणामुळे येऊ शकते अथवा मेंदूतील बिघाडामुळे देखील येऊ शकते.
चक्कर येण्याची कारणे
- BPPV
- मेनियर आजार
- डिहायड्रेशन
- रक्तदाब
- हृदय आजार
- मेंदूचे आजार
- भीती वाटणे
- हायपोग्लिसेमियाे
- कानात इन्फेकशन
- जास्त शारीरिक ताण
- अर्धर्शिशी
- अशक्तपणा
चक्कर येण्याची लक्षणेे
- गरगरणे किंवा गोल फिरल्यासारखे वाटणे
- शारीरिक संतुलन बिघडणे
- मळमळणे
- उलटी होणे
- बेशुद्ध पडणे
- हलकी डोकेदुखी
डोके दुखापत,डोकेदुखी,जास्त ताप,धूसर दृष्टी,सुनावणी तोटा,शुद्ध हरपणे,बोलण्यात अडचण,छाती दुखणे किंवा धडधडणे ई लक्षणे दिसली तर वेळ न घालवता लगेच आपल्या डॉक्टरांना संपर्क करावा.
चक्कर येणे आजाराचे निदान कसे केले जाते?
- क्लिनिकल तपासणी (डोळा आणि कान)
- न्यूरोलॉजिकल परीक्षण
- रक्त चाचण्या
- ब्रेन स्कॅन एमआरआय
उपचारपद्धती
उपचारपद्धती हि रुग्णाला ज्या कारणांमुळे चक्कर येते त्यानुसार असतात
- BPPV (BD व्यायाम आणि Epley )
- हायड्रेशन
- मायग्रेनची औषधे
- अॅक्सिऑलिटिक्स
चक्कर येणे संबंधित प्रतिबंधात्मक उपाय
- शरीराच्या स्थितीत अचानक बदल टाळा
- स्थिरतेसाठी आधार वापरणे
- संतुलीत व्यायाम करणे
- काही दिवस वाहन चालविणे टाळा
- पुरेसे हायड्रेशन
- काही दिवस वाहन चालविणे टाळा
अशा प्रकारे काळजी घेऊन आपण चक्कर येणे या समस्येचे निदान करून त्यावर मात करू शकतो तसेच भविष्यातील येणाऱ्या समस्या टाळू शकतो.
धन्यवाद,