नमस्कार
मित्रांनो कोविड-१९ च्या साथीमुळे काम करताना नवीन संकल्पना सुरू झाली ती म्हणजे वर्क फ्रॉम होम, होय घरून काम करणे. ही काम करायची पद्धत जेवढी चांगली आहे तेवढीच आता त्रासदायक देखील ठरू लागली आहे. आज आपण पाहणार आहोत वर्क फ्रॉम होम मुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि या समस्या कमी करण्यासाठी काही सोपे उपाय.
वर्क फ्रॉम होम मुळे निर्माण झालेल्या समस्या
या कामाच्या पद्धतीमुळे काही मानसिक आणि काही शारीरिक समस्या तयार झाल्या आहेत आणि कामाचा ताण वाढला आहे. या समस्या समजणे सोपे होण्यासाठी यांची विभागणी दोन प्रकारात आम्ही केली आहे ते प्रकार पुढीलप्रमाणे –
१) वैद्यकीय –
- मान आणि खांदे दुखी
- पाठदुखी
- डोके दुखणे
- डोळ्यांना त्रास होणे
- झोप न येणे
- अतिरिक्त वजन वाढ
खासकरून या समस्या शारीरिक हालचाल कमी होणे,जास्त काळ लॅपटॉप व कम्प्युटरवर काम करणे आणि खाण्याच्या वेळा न सांभाळणे यामुळे होतात.
२) अ-वैद्यकीय –
- काम करण्यात कमी प्रभावी
- माणुसकीचा अभाव
- वरिष्ठांकडून अवास्तव कामाची अपेक्षा
- डोळ्यांना त्रास होणे
- लहरीपणा
- नियंत्रण अभाव
एका अभ्यासात लक्षात आले की ऑफीमधील लोकांना असं वाटतं आपले कर्मचारी घरी आहेत म्हणजे जास्त काम करू शकतील पण प्रत्यक्षात तर उलट परिस्थिती आहे महिला आणि ज्यांना मुले आहेत त्यांना तर आता घर आणि ऑफिस दोन्ही एकाच वेळी सांभाळावे लागत आहे.
वर्क फ्रॉम होममुळे निर्माण झालेल्या समस्या कमी करण्यासाठी काही सोपे उपाय
- घरातील एक जागा ऑफिसचे काम कारणासाठी निवडा
- बसण्यासाठी एक चांगली टेबल खुर्ची आणि शक्य असेल तर बेड चेअर वापरा
- काही काळ नैसर्गिक हवा आणि उजेड शरीरासाठी उपयुक्त आहे
- दर दोन तासांनी काही हालचाल किंवा थोडा व्यायाम करा
- डोळ्यांना काही काळ विश्रांती द्या
- दिवसातून १५-२० मिनिटे योगा, व्यायाम, प्राणायाम याचा वापर करा
- योग्य वेळी आणि नियमित आहार घ्या
- दिवसातून ७-८ ग्लास पाणी प्यावे
- घरच्यांना वेळ द्या
- कामाचे आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करा
तर हे होते काही मुद्दे ज्यांचा उपयोग करून आपण बऱ्याच प्रमाणात वर्क फ्रॉम होम मुळे होणाऱ्या समस्या कमी करू शकतो.शेवटी सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे वर्क फ्रॉम होम ही एक व्यवस्थापन प्रक्रिया आहे आणि जर याचे योग्य व्यवस्थापन केले तर बऱ्याच अंशी समस्या कमी होतील,तर पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन.