उच्चरक्तदाब आणि त्याविषयी असलेले रूग्णांच्या मनातील
सामान्य प्रश्न
नमस्कार,
आज आपण रक्तदाब या आजाराबद्दल रुग्णाच्या मनात उद्भवणार्या काही सामान्य प्रश्नांबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.मित्रांनो,तुम्हाला माहिती आहे का ? भारतातील प्रत्येक पाचपैकी एका व्यक्तीला रक्तदाबाचा आजार आहे. कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या मते, भारतात 8 कोटीहून अधिक रुग्णांना रक्तदाब आजार आहे. चला तर मग पाहूया रक्तदाब आणि त्याविषयीचे रुग्णांना पडणारे सामान्य प्रश्न जे नेहमी विचारले जातात.
प्रश्न क्र. १: रक्तदाब सामान्य आहे कि उच्चरक्तदाब आहे हे कसे मोजावे/समजावे ?
उत्तर : अमेरिकन, युरोपियन आणि भारतीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रक्तदाब 140/90 पेक्षा जास्त असेल तर तो उच्च रक्तदाब मानला जातो.परंतु एखाद्या वेळी किंवा काही वेळी जर हा रक्तदाब दर्शविला असेल तर लगेच उच्चरक्तदाब आहे असे लगेच मानले जात नाही,सर्व मार्गदर्शक तत्वानुसार डॉक्टर रुग्णाला असा सल्ला देतात कि किमान १-२ आठवडे नियमित रक्तदाब तपासाला पाहिजे आणि जर नेहमी या कालावधीत १४०/९० किंवा त्यापेक्षा जास्त रीडिंग असेल तर तो उच्च रक्तदाब मानला जातो.
प्रश्न क्र.२ : मला चक्कर येत नाही, माझं डोक दुखत नाही पण रक्तदाबाचे रिडींग आहे तर मी उपचार घ्यावे का ?
उत्तर : एक मोठी चुकीची संकल्पना सध्या जगभरातील रुग्णांच्या मनात आहे ती म्हणजे मला कोणतीही लक्षणे नाहीत तर मला उपचार घेण्याची गरज नाही, असे दुर्लक्ष केले तर रक्तदाबाचा त्रास वाढतो. रक्तदाबाच्या बाबतीत खूप वेळा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. काही रुग्णांना डोकेदुखी,डोकं जड होणे ,छातीत भरून येणे अशी काही लक्षणे दिसून येतात. रक्त्तदाब समस्येकडे दुर्लक्ष केले तर आपल्या शरीराच्या अनेक अवयवांना दुखापत होते, त्यामुळे हा आजार कधी कधी जीवघेणा ठरू शकतो. म्हणून पुढील अडचणी टाळण्यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घ्या, लक्षणे नसली तरी.
प्रश्न क्र ३ : औषध न घेता रक्तदाब नियंत्रित करता येईल का ?
उत्तर : हा सर्व रुग्णांचा आवडीचा विषय आहे. काही नॉनफार्माकोलॉजिक इंटरव्हेशन्स आहेत ज्यांचा उपयोग करून औषधाव्यतिरिक्त रक्तदबावर नियंत्रण आणले जाऊ शकते परंतु याचा उपयोग करण्यासाठी आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची अनुमती असणे आवश्यक आहे.आता आपण जाणून घेऊ असे काही इंटरव्हेशन्स ज्यामुळे रक्तदाब आपण काही मर्यादेपर्यंत नियंत्रित करू शकतो ते पुढील प्रमाणे .
- वजन कमी करणे .
- नियमित व्यायाम किंवा चालणे.
- पोषक आहार.
- धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
- ताण कमी करणे.
प्रश्न 4: रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि काय खाणे टाळावे?
उत्तर : रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहारात काही बदल आहारतज्ञ सुचवतात जे रुग्णांना खूप फायदेशीर ठरतात. काही गोष्टी रक्तदाबाच्या रुग्णांनी खाणे टाळावे ते म्हणजे अतिरिक्त मिठाचे पदार्थ जसे कि पापड, सॉस, लोणचे ,डब्बा बंद खाद्यपदार्थ ई किंवा खाल्ले तर कमी खा. त्याचप्रमाणे तळलेले पदार्थ ज्यामध्ये संपृक्त चरबीचे प्रमाण अधिक असेल असे लोणी, खारट स्नॅक्स आणि फास्ट फूड सारखे पदार्थ खाणे कमी करा. फळे,भाज्या,कडधान्य,मासे, मांस असे पदार्थ खावेत.
प्रश्न 5 : गेले ५ वर्षे रक्तदाब आजार आहे , उपचार आणि औषधे नियमित सुरु आहेत आणि काही त्रास होत नाहीये तरी मला ठरविक अंतराने डॉक्टरकडे जाऊन विशेष चाचणी करून घेणे आवश्यक आहे का ?
उत्तर : हि खूप चुकीची मानसिकता आहे कि मी औषध घेतोय मला त्रास नाही म्हणजे मला डॉक्टरांकडे जायची गरज नाही किंवा कोणत्या चाचण्या करण्याची गरज नाही. जेव्हा पहिल्यांदा रक्तदाबाचा त्रास समजतो तेव्हाचे १५ दिवस ते १ महिना हा दैनंदिन चेकअप खूप महत्वाचा असतो या काळातील आपल्या रक्तदाबाच्या निरीक्षणांवर पुढील उपचारांची दिशा ठेवली जाते. एकदा राक्तदाब नियंत्रित झाला कि पुढील ३ ते ६ महिने चेकअप खूप महत्वाचे असते. त्याच बरोबर जर रूग्णाला हृदय,किडनी,मेंदू संबंधित आजार असतील तर अशा रुग्णांसाठी लवकरात लवकर तपस गरजेचा असतो. सुरुवातीला रक्तदाबाबरोबर काही चाचण्या गरजेच्या असतात त्या म्हणजे क्रिएट,इलेकट्रोलाईट,युरिक ऍसिड , लघवी तपास,इलेकट्रोकार्डिओग्राफ ई . कधीकधी रुग्नांना असा वाटतं आता मला काही त्रास नाही तरी मी चेकअप टेस्ट का कराव्या याचं साधं सोप उत्तर म्हणजे कोणतेही डॉक्टर तुम्हाला चेक करताना फक्त रक्तदाब चेक करत नाहीत तर तुमच्या शरीरातील इतर अवयवांना नुकसान होऊ नये याची देखील काळजी घेतात आणि पुढील गुंतागुंत होणार नाही याची दक्षता घेतात.
तर मित्रांनो आज आम्ही आपल्या मनातील रक्तदाबाविषयी असलेल्या काही शंकांचे निरसन करायचा प्रयत्न केला.परत भेटू पुढील लेखात एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा आपली काळजी घ्या.