नमस्कार मित्रांनो ,
जगात असे अनेक रुग्ण आहेत जे गरज असताना सुद्धा इन्सुलिन उपचार घेत नाहीत त्यामुळे त्यांची मधुमेह पातळी नियंत्रणात येत नाहीच आणि अनेक समस्या निर्माण होतात.
इन्सुलिन काय आहे ?
इन्सुलिन हे एक नैसर्गिक संप्रेरक आहे जे स्वादुपिंडा मध्ये तयार होतो, जेव्हा स्वादुपिंडात इन्सुलिन निर्मिती कमी होते तेव्हा ते बाहेरून द्यावे लागते. संपूर्ण जागतिक मार्गदर्शक तत्वानुसार इन्सुलिन उपचार हे अत्यंत सुरक्षित आहे आणि इतर औषधाच्या तुलनेत इन्सुलिनचे दुष्परिणाम सुद्धा अत्यंत कमी आहेत
इन्सुलिन कोणाला दिले जाते?
- टाईप २ मधुमेह असणारे रुग्ण जे पूर्ण औषध घेत आहेत पण तरी मधुमेह पातळी नियंत्रणात नाही.
- टाईप १ मधुमेह असणारे रूग्ण.
- बाळंतपणातील मधुमेह असणाऱ्या महिला.
- टाईप २ मधुमेह असणारे रुग्ण ज्यांना मूत्रपिंड अथवा यकृताचे आजार आहेत.
इन्सुलिनबद्दल गैरसमज
- इन्सुलिन हा मधुमेह उपचारातला शेवटचा भाग आहे आणि आता मधुमेह शेवटच्या पातळीला पोहोचला आहे
- एकदा इन्सुलिन चालू झाले की ते आयुष्यभर घ्यावे लागते.
- इन्सुलिन उपचार सुरू केले की त्याचे अनेक दुष्परिणाम होतील.
- इन्सुलिन घेतले की फिरता येणार नाही किंवा बाहेर इन्सुलिन घेता येणार नाही.
- इन्सुलिन घेताना खूप वेदना होतील.
आज आपण पाहिलं की इन्सुलिन घेणे किती फायदेशीर आणि सुरक्षित आहे,जेव्हा आपण काही चुकीच्या गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्या मनात भीती निर्माण होते म्हणून चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि आमचा सल्ला असेल जेव्हा इन्सुलिन घ्यायची वेळ येईल तेव्हा डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य पद्धत जाणून घ्या.