नमस्कार,
ऍसिडिटी हि एक सामान्य समस्या आहे, बऱ्याच रुग्णांना हा त्रास जाणवतो.आज आपण ऍसिडिटी हा त्रास कशामुळे होतो त्याची कारणे आणि हा त्रास होऊ नये यासाठीचे काही उपाय कोणते ते पाहू.
ऍसिडिटी म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
याला मराठी मध्ये आम्ल्पित्त असे देखील म्हणतात. जेव्हा आपण काही अन्न खातो तेव्हा जठर ग्रंथी काही द्रव पदार्थ तयार करतात त्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतात , या ऍसिडचे प्रमाण पातळीपेक्षा वाढते तेव्हा ऍसिडिटी हि समस्या उद्भवते. याचे २ प्रकार आहेत.
- GERD reflux esophagitis
- Stomach ulcers
ऍसिडिटीची कारणे
- आहाराच्या चुकीच्या सवयी
- काही पदार्थांचे जास्त सेवन
- औषधांचे दुष्परिणाम
- ताणतणाव
- अपुरी झोप
- धूम्रपान
- मद्यपान
ऍसिडिटीची लक्षणेे
- पोटदुखी
- पोटात जळजळ होणे
- छातीत दुखणे
- छातीत जळजळ होणे
- अन्न गिळताना त्रास होणे
- मळमळणे, उलटी होणे
- पोटफुगी
- उचकी लागणे
- तोंडातून दुर्गंधी येणे
- शौचातून रक्त पडणे
- उलटीमधून रक्त पडणे
- कोरडा खोकला. ई
ऍसिडिटीकडे दुलक्ष करू नये आणि लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांना संपर्क करावा.कारण बऱ्याचदा छातीत दुखणे किंवा छाती जड होणे हि हृदय रोगाची सुद्धा लक्षणे असू शकतात.
ऍसिडिटी होऊ नये यासाठीचे उपाय
- वजन कमी करणे
- पोषक आहार घेणे
- वेळेवर जेवण करणे
- रात्री उशिरा जेवण करू नये
- चहा कॉफी जास्त घेऊ नये
- धूम्रपान व मद्यपान टाळावे
- वेदनाशामक औषधें टाळावीत
- योग आणि ध्यान करावे
- नियमित व्यायाम
ऍसिडिटीचे निदान
सहसा डॉक्टर ऍसिडीटीचे निदान क्लिनिकल चेकिंग मध्ये करतात परंतु काही वेळा काही रुग्णांमध्ये इंडोस्कोपी हि चाचणी करावी लागते.ज्या रुग्णांचे वय ४० पेक्षा जास्त असते,वजन जास्त असते किंवा हृदय विकार,रक्तदाब,मधुमेह असे पूर्वीचे आजार असतात अशा रुग्णांमध्ये उपचार सुरु करण्या पूर्वी ECG चाचणी करतात. यामुळे डॉक्टरांना निदान करणे आणि उपचाराची दिशा ठरवणे सोपे होऊन पुढील आरोग्य विषयक जटिलता टाळता येते. काही क्वचित रुग्णांमध्ये वेळेवर उपचार केले नाहीत तर Oesophageal stricture, Barret’s esophagus किंवा stomach कैंसर ह्या समस्या उद्भवतात.
शेवटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट ऍसिडिटीकडे दुर्लक्ष करू नका आणि जर काही लक्षणे दिसली तर डॉक्टरांशी संपर्क साधा कृपया स्वतःहून वैद्यकीय सल्ला न घेता कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.
धन्यवाद,