नमस्कार मित्रांनो ,
मित्रांनो आनंद हा जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आनंद ही एक मानसिक भावना आहे ज्यामुळे माणसाला समाधान मिळते. आनंदी राहण्याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत.सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.त्यामुळे अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद मिळते.कोणत्याही कठीण परिस्थितीत आनंदी माणूस सहज मात करून पुढे जातो. आनंदी राहिल्यामुळे मानसिक ताण कमी होतो.
प्रत्येक माणसाची आनंद मिळवायची पध्दत वेगळी आहे. वयाने मोठी असणारी माणस गप्पा मारून, पुस्तके वाचून,संगीत ऐकून आनंद मिळवतात तर लहान मुले आईस्क्रीम, चॉकलेट,टेलिव्हिजन वर कार्टून पाहणे आणि भरपुर खेळून आनंद मिळवतात.स्त्रियांना परिवाराची काळजी घेणे आणि वस्तू खरेदी करण्यात आनंद मिळतो. मध्यम वयीन व्यक्तीना कामाच्या ठिकाणी त्याचं कौतुक झालं की आनंद मिळतो.
जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्या शरीरात हॅप्पी हॉर्मोन्स तयार होतात त्यांना ऑक्सिटोसिंन आणि सेरेटोनिन असे म्हणतात. या हॉर्मोन्समुळे आपल्याला आनंदाची जाणीव होते.
आनंदी राहणे हे काही कठीण काम नाही,आपल्या रोजच्या जीवनात काही छोटे बदल करून आपण नेहमी आनंदी राहू शकतो.एखादा छंद जोपासा,संगीत ऐका, मित्रांसोबत बोला यामुळे आपल्या मनावरील ताण किंवा दडपण कमी होते.
भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा जास्त विचार करत बसू नका त्याने मानसिक ताण वाढेल आणि साध्य काही होणार नाही आणि भविष्यात काय होणार हा देखील विचार करणे सोडून वर्तमान काळाचा आता काय चालू आहे त्याचा विचार करा. तेव्हा मित्रांनो आनंदी राहणे खूप सोपे आहे आणि त्यासाठी खूप काही वेळ,पैसा आशा गोष्टीची गरज नाही. आपण एकमेकांना आधार दिला,मदत केली तर सहज आनंद प्राप्त करू शकतो.सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंद मिळवणे हे आपल्याच हातात आहे. तेव्हा आनंदी राहा समाधानी राहा,मजेत आयुष्य जगा. पुन्हा भेटू नवीन विषयावर माहिती मिळवण्यासाठी.