आज आपण ब्लड प्रेशर संबंधित काही महत्वपूर्ण माहिती घेऊया.आपल्याला आश्चर्य वाटेल जगात २०% लोकांना समजत नाही आपल्याला ब्लड प्रेशर चा त्रास आहे,त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
ब्लड प्रेशर जवळपास मधून मधून सर्वानी तपासणे चांगले.काही लोकांनी नियमित ब्लड प्रेशर तपासणे आवश्यक आहे,काही समस्यामुळे ब्लड प्रेशरमधे बदल होतात ते पुढीलप्रमाणे -
इ लोकांनी वारंवार ब्लड प्रेशर तपासणे गरजेचे आहे.
हि सर्व रुग्णांमध्ये सामान्य गोष्ट आहे. ब्लड प्रेशर तपासाची २ उपकरणे आहेत. मर्क्युरी एनरॉईड मशीन आणि दुसर म्हणजे डिजिटल मशीन. सर्वानुमते मर्क्युरी एनरॉईड मशीन मध्ये कमी चड-उतार असतात परंतु हि पद्धत वापरताना स्थेतसस्कोप वापरावा लागतो आणि तज्ञ स्टाफ गरजेचा असतो,जे घरी शक्य होत नाही. डिजिटल मशीन मध्ये तपास करताना हालचाल, भीती,शारीरिक स्थिती ई गोष्टीमुळे बदल दिसतात. त्यामुळे उपचार करताना डॉक्टर घरचे रिडींग आणि डॉक्टरनी घेतलेले रिडींग दोन्ही पाहून उपचार पद्धती ठरवतात.
याला मेडिकल भाषेत व्हाईटकोट हायपरटेंशन म्हणतात. जगातील ३०% रुग्णांमध्ये हा प्रॉब्लेम आढळून येतो. काहींना हॉस्पिटलचे टेन्शन येत. अशा परिस्थितीत डॉक्टर रुग्णाला थोडावेळ १५-२० मिनिटं शांत बसायला सांगतात आणि नंतर ब्लड प्रेशर तपासतात आणि घरी डिजिटल मशीनने नियमित काही दिवस तपास करायचा सल्ला देतात. जर घरी तपासलेले सर्व रिडींग नॉर्मल असतील तर उपचार करण्याची गरज नाही, पण काही वेळा घरी रिडींग नॉर्मल असतात आणि काही रिडींग जास्त असतील तर अशा वेळी डॉक्टर ABPM ने ब्लड प्रेशर तपासायचा सल्ला देतात. ABPM हे एक बँड सारखे उपकरण आहे जे हातावर लावले जाते आणि त्यात दिवसभरातील रिडींग तपासल्या जातात,ज्याचा उपयोग करून डॉक्टर उपचारांची दिशा ठरवतात.
औषधे घेऊन पण जर ब्लड प्रेशर जास्त असेल तर यामध्ये २ कारणे असू शकतात ती म्हणजे अनकंट्रोल हायपरटेंशन आणि दुसरं रेसिस्टन्ट हायपरटेंशन.औषधे वेळेत न घेणे,नियमित डाएट न घेणे,मानसिक तणाव हि कारणे अनकंट्रोल हायपरटेंशनची आहेत. तर सर्व काळजी घेऊन सुद्धा जर ब्लड प्रेशर जास्त असेल त्याला रेसिस्टन्ट हायपरटेंशन म्हणतात. अशा रुग्णांना ३पेक्षा अधिक औषधे घेण्याची गरज पडते किंवा त्यांना अजून कोणतातरी दुसरा आजार असण्याचा संभव असतो. त्यासाठी त्यांना वेगळ्या तपासण्या करण्याची गरज असू शकते. त्याआधारे डॉक्टर पुढील उपचार देतात.
तर आशा आहे कि आज वरील ४ प्रश्नाच्या साहाय्याने आपल्याला ब्लड प्रेशर विषयी महत्वपूर्ण माहिती मिळाली असेल,पुन्हा भेटू एका नवीन विषयाची माहिती घेऊन तो पर्यंत स्वस्थ राहा निरोगी राहा.
Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of
everything.